जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'दि. बा. पाटील यांचे नाव इतर ठिकाणी देता येईल; नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचेच नाव, त्यात वाद नको'

'दि. बा. पाटील यांचे नाव इतर ठिकाणी देता येईल; नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचेच नाव, त्यात वाद नको'

'दि. बा. पाटील यांचे नाव इतर ठिकाणी देता येईल; नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचेच नाव, त्यात वाद नको'

दि. बा पाटील आणि बाळासाहेब ठाकरे हे महान नेते आहेत. त्यावरून वाद न होता आता विमानतळाला नाव देण्याचे ठरले आहे. दि बा पाटील यांचे नाव इतर ठिकाणी देता येईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जून : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बां. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी होत आहे. या मागणीवरून सध्या वाद होत आहे. त्यावर आज शिवसेना नेते, मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील विमानतळाला यापूर्वीच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे ठरले होते, त्यात वाद नको, असे म्हटले आहे. नवी मुंबईतील विमानतळाला यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे ठरले होते. त्यामध्ये आता वाद नको आहे. दि. बा पाटील आणि बाळासाहेब ठाकरे हे महान नेते आहेत. त्यावरून वाद न होता आता विमानतळाला नाव देण्याचे ठरले आहे. दि बा पाटील यांचे नाव इतर ठिकाणी देता येईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport – NMIA) नामकरणावरील वाद अद्याप मिटलेला नाही. काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. विमानतळाच्या नामकरणावरून प्रकल्पग्रस्त विरुद्ध शिवसेना असा सामना रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बां. पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी होत आहे. दरम्यान, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या नावामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केलंय. (Dispute over naming of Navi Mumbai International Airport) हे वाचा -  …तर मास्क लावण्याची काहीच आवश्यकता नाही; आता BJP नेत्याने दिले उपदेशाने डोज, होर्डिंग लावून जागरुकतेचा संदेश या वादाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. “नाव तर आम्ही साहेबांचेच देणार, मराठी अस्मिता जगभर होणार” अशा आशयाचे बॅनर शिवसेनेनं लावले होते. सर्व प्रकल्पग्रस्त ‘दिबां’च्या नावावर ठाम असताना शिवसेना मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात