मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्या'; सेनेच्या नगरविकास मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्या'; सेनेच्या नगरविकास मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई विमानतळाचं काम दीर्घकाळ रखडलं आहे. आता या विमानतळाबाबत नगरविकास मंत्र्यांनी एक निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केलं आहे.

महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई विमानतळाचं काम दीर्घकाळ रखडलं आहे. आता या विमानतळाबाबत नगरविकास मंत्र्यांनी एक निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केलं आहे.

महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नवी मुंबई विमानतळाचं काम दीर्घकाळ रखडलं आहे. आता या विमानतळाबाबत नगरविकास मंत्र्यांनी एक निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 डिसेंबर : नवी मुंबई उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi mumbai international airport) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव देण्याची मागणी नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना त्यांनी निवेदनाचं पत्र दिलं आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्यासाठी सध्याचे महाविकास आघाडी सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. कोरोनाच्या कठीण काळातही राज्याच्या विकासाचा वेग मंदावणार नाही याची  दक्षता सरकारकडून घेण्यात आली. राज्यात उद्योग क्षेत्राशी निगडीत असे  61 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

पुढे ते म्हणतात, 'महाराष्ट्रात विविध विकास प्रकल्पांची कामे धडाक्यात सुरू आहेत. यातीलच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे काम सिडकोच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहे. निर्धारित वेळेत हे विमानतळ जनतेच्या सेवेत रूजू करण्यासाठी सिडको कटिबद्ध आहे. या विमानतळाला हिंदुसदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे. बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. मराठी माणसाला त्यांनी आत्मभान दिलं. अशा उत्तुंग नेत्याचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे हे त्या वास्तूचा गौरव करण्यासारखे आहे.' याशिवाय 'देशभरातील विमानतळांना त्या-त्या ठिकाणच्या महान नेत्यांची नावं दिलेली आहेत. त्यामुळे नवी मुंबइतील विमानतळालाही हाच निकष लागू केली जावा.' असंही त्यांनी म्हटलं आहे.

'या नामकरण प्रक्रियेचा निर्णय पुढे नेण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा, अशी विनंतीही शिंदे यांनी आपल्या पत्राच्या शेवटी केली आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निवेदनाबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या विमानतळ उभारणीचे काम आधी जीव्हीके समूहाला दिले होते. आता ते अदानी समूहाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. विविध कारणांनी रखडलेल्या या विमानतळाचे काम पूर्ण होण्यास 2022 ची डेडलाइन दिलेली आहे. मात्र सध्याची सगळी परिस्थिती पाहता विमानतळ कार्यान्वित होण्यास उशीर लागू शकतो. हे विमानतळ संपूर्णपणे ग्रीनफिल्ड विमानतळ असेल असे जाहीर करण्यात आले आहे.

First published:

Tags: Bal Thackeray (Politician), Mumbai, Shiv Sena chief