
सोमवार रात्री 8 वाजल्यापासून फक्त अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता अन्य सर्व दुकानं बंद.

रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी. अन्य वेळातही जमावबंदी आदेश लागू. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यावर निर्बंध

स्पा, सलून, ब्युटी पार्लर, केशकर्तनालयं राहणार बंद. इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लस घेणं बंधनकारक. तरच दुकान, सेवा सुरू करण्यास परवानगी

सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद. फक्त रात्री 8 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी आणि टेक अवे/ पार्सल मिळेल. शनिवार- रविवार पार्सल सेवाही नाही. फक्त होम डिलिव्हरीला परवानगी.

रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाड्या आणि स्टॉल्सना सकाळी 7 ते रात्री 8 या वेळात फक्त पार्सल देण्यास परवानगी. तिथे उभं राहून किंवा बसून खाता येणार नाही.

लग्नकार्य फक्त 50 जणांच्या उपस्थितीत. पण मंगल कार्यालय, हॉल इथल्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट (RT-PCR)निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक.




