मुंबई, 13 मे : कर्नाटकात भाजपला मोठा धक्का बसत असल्याचं दिसत असून काँग्रेस बहुमताच्या जवळ पोहोचले आहे. काँग्रेस सध्या ११० जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 79 जागांवर पुढे आहे याशिवाय जेडीएस 28 तर इतर उमेदवार 7 जागी आघाडीवर आहेत. कर्नाटकात काँग्रेसच्या बाजूने जनतेचा कौल दिसत आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. कर्नाटकात भाजपच्या नेत्यांनी तंबू ठोकला होता. पण मोदी आणि शहा यांना लोकांनी झिडकारलं आहे. महाराष्ट्रातून काही लोक गेले होते, जिथे जिथे गेले तिथे पराभव झाला होता. महाराष्ट्रातून एक टोळीही गेली होती. पण लोकांनी साफ नाकारलं आहे. कर्नाटकाचा निकाल 2024 साठी विरोधी पक्षासाठी सत्तेचा दरवाजा उघडणार असेल. ही लोकांची भावना आहे. कर्नाटक निकाल हा लोकांची मन की बात असल्याचंही राऊत म्हणाले. Karnataka Election Result 2023 : भाजपच्या मिशन-दक्षिणला झटका! कर्नाटक हातातून गेल्यास ही राज्यंही गमावणार? पंतप्रधान मोदींचं कुणी ऐकलं नाही. अमित शहांचं कुणी ऐकलं नाही. राज्या राज्यातून ज्या टोळ्या आल्या आहेत. ती लोकं आता प्रचाराला बळी पडले नाही. आताही काही तरी तोडफोड करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला. द केरळ स्टोरी या चित्रपटावरूनही प्रचंड राजकारण झालं. याची चर्चा कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार होती. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, कर्नाटकमध्ये कोणतीही स्टोरी चालली नाही, फक्त लोकशाहीची स्टोरी चालली. बजरंग बलीची गदा ही भाजपच्या डोक्यावर पडली. बजरंग बली हा श्रीरामांचा भक्त होता, पण तो जनतेच्या आणि सत्याच्या बाजूने गेला आहे. Karnataka Election result Live Updates : कर्नाटक निवडणूक निकालाचे लेटेस्ट अपडेट वाचा एका क्लिकवर महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते भाजपने कर्नाटकात प्रचारासाठी पाठवले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही प्रचाराला गेले होते. संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं की, महाराष्ट्रासारख्या राज्यातून फौजाच्या फौजा पाठवल्या, लोक कमी खोके होते, पण लोकांनी खोके नाकारले. योगी आदित्यनाथ गेले होते. सगळ्या नेत्यांनी तंबू ठोकले होते, पण लोकांनी नाकारला. बेळगावात मराठी नेत्यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न केले, तिथे सर्वांची मतं एक राहावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. एकिकरण समितीची एखादी जागा येईल. पण, तिथे जागा पडाव्यात यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पैशांचा महापूर केला. आपल्या लोकांना पाडण्यासाठी गद्दारी केली असा आरोप संजय राऊत यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.