मुंबई, 11 मार्च : दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय, व्यावसायिक भागीदार सदानंद कदम यांना ईडीने 15 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. काल (शुक्रवारी 10 मार्च) सलग चार तास चौकशीनंतर कदम यांना ईडीने अटक केली होती. सदानंद कदम यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे. तसेच ईडीने सादर केलेल्या पुराव्यात अनिल परब यांच्या खात्यातून एक कोटी रूपये विभा साठे यांना दिल्याचे उघड झाले आहे. तर सदानंद कदम यांच्या माध्यमातून ही रक्कम दिल्याचेही ईडीने म्हटलं आहे. ईडीचा युक्तिवाद कोर्टानं मान्य केला आहे. मात्र, ईडीने 14 दिवसांच्या कोठडीची मागणी फेटाळली आहे.
कोर्टात काय युक्तीवाद झाला?
ईडीचे वकील सुनील गोंसालवीस यांनी आरोपी रिमांड कॉपीवर, सदानंद कदम यांची स्वाक्षरी घेण्याची कोर्टाला परवानगी मागितली. कदम यांचे वकील निरंजन मुंदरगी यांनी मान्यता दिली. 11 मे 2022 ला दाखल तक्रारीवर ED ने ECR दाखल केला.
तुम्हाला ED नं केव्हा आणलं? कोर्टाचा सदानंद कदम यांना सवाल
मला काल सकाळी साडेसातला ताब्यात घेतलं - कदम
वाचा - विधान परिषदेच्या सुरक्षेतील सर्वात मोठी त्रुटी; एक संशयित व्यक्ती सभागृहात?
सुनील गोंसालवीस (ED चे वकील) -
ECIR 11 मे 2022 ला दाखल केला. अटक करण्यासाठी योग्य पुरावे समोर येत नाही. तोपर्यंत अटक करण्याची आवश्यकता नव्हती. PMLA केस ECIR वर आधारीत आहे. एफआयआर, खाजगी तक्रार, सरकारी तक्रार नसेल तर ECIR रजिस्टर होणार नाही. दाखल FIR वर ECIR दाखल. चौकशी, साक्ष, पुरावे यांची तपासणी केल्यानंतर अटक करण्याची आवश्यकता निश्चित केली जाते. IPC 420 आणि पर्यावरण कायद्यानुसार FIR दाखल झाला. फौजदारी आणि ECIR केसेस सुनावणी स्वतंत्र होते, एकत्र नाही. सदानंद कदम यांना 3 वेळा समन्स पाठवले होते. 12 डिसेंबर 2022, 28 फेब्रुवारी 2023 आणि 09 मार्च 2023. मात्र, ते हजर झाले नाही. चौकशीसाठी त्यांना ED कार्यालयात आणलं. चौकशीनंतर 10 मार्चला रात्री 9 वाजता त्यांना अटक केली. अटक करण्यासाठी सबळ पुरावा असल्यानं अटक केली.
निरंजन मुंदरगी (सदानंद कदम यांचे वकील)
PMLA कायदा, CRZ अनधिकृत बांधकाम करीता लागू नाही. खाजगी तक्रारही CRZ उल्लंघनाची आहे. या तक्रारीवर त्यांनी ECIR दाखल केलं. साई रिसॉर्टशी आमचा संबंध आहे. दुसऱ्या रिसॉर्टशी आमचा संबंध नाही. 202 रिपोर्ट वर पोलीस चौकशीत साई रिसॉर्ट वर्किंग नाही हे स्पष्ट झालं आहे. ऑपरेशनमध्ये नसताना समुद्रात वेस्ट वॉटर आम्ही सोडलं असा आरोप कसा?
रिसॉर्टसाठी वीज मिळवण्यासाठी रीतसर महावितरणकडे अर्ज करण्यात आला होता. त्यासाठी जवळपास प्रॉपर्टी टॅक्स म्हणून 46 हजार भरण्यात आले होते. महावितरणची फसवणूक झाली असेल तर त्यांनी तक्रार करणे अपेक्षित होतं. कुणीही राजकीय व्यक्ती दापोलीत जातो आणि गुन्हा दाखल करून तपास यंत्रणांनी तपास करावा अशी मागणी करतो. हे कुठल्या नियमात बसतं?
अनिल दत्तात्रय परब, साई रिसॉर्ट आणि सी कोच या तिघांच्या विरोधात तक्रार आणि गुन्हा आहे. कदम यांचं नाव गुन्ह्यात नाही का? कोर्टाचा सवाल
कदम यांच नाव FIR मध्ये नाही. ते फक्त एका शिडीची पायरी आहेत, त्यांचा वापर करून दुसरीकडे गोळी झाडण्याचा ईडीचा उद्देश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil parab, Ramdas kadam