मुंबई, 1 डिसेंबर : राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल न्यायालयीन चौकशी आयोगात (Chandiwal Commission) आजही सचिन वाझे (Sachin Vaze) याची उलटतपासणी घेण्यात आली. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी उलटतपासणी घेतली असून आजच्या उलट तपासणी देखील सचिन वाझे याने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यात सर्वात महत्त्वाचे उत्तर होते ते म्हणजे अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना आपण त्यांना कधी भेटलो आहोत याबाबत आपल्याला काहीच आठवत नाहीये.
आज साधारणपणे पावणे एकच्या सुमारास चांदीवाल न्यायालयीन चौकशी आयोगाची सुनावणीस सुरुवात झाली. सचिन वाझे याला उलट तपासणी करता विटनेस बॉक्समध्ये बोलावलं गेलं आणि देशमुख यांच्या वकील अनिता यांनी सचिन वाझेला प्रश्न विचारले. पण सचिन वाझे यांनी उत्तर देण्याआधीच अनिल देशमुख यांच्या दुसऱ्या एका वकिलाने मध्यस्थी करत सचिन वाझे आणि परमवीर सिंग या दोघांची दोन दिवसापूर्वी झालेली तासाभराची भेट याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये करण्यात आलेले वृत्तांकनावर नाराजी व्यक्त केली. तसेच ती कोणत्याही प्रकारची ग्रुपची बैठक नव्हती असं सांगून प्रसारमाध्यमांनी केलेल्या वर्तन कारणामुळे परमवीर सिंग यांना त्रास होतोय आयोगाला सांगितलं.
मात्र याच वेळेस स्वतः सचिन वाझे यांनीच या अनिल देशमुख यांच्या वकिलांच्या नाराजीला उत्तर देच प्रसारमाध्यम त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि जे घडलं ते त्यांनी लिहिलं असं सांगितलं. तर न्यायालयीन चौकशी आयोगाचे वरिष्ठ विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी मध्यस्थी करत ही खुली चौकशी आहे यात सर्वांना काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. जे घडलं ते सांगितलं गेलं ते लिहिलं गेलं असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला. तोच अनिल देशमुख यांच्या वकिलांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आणि पुन्हा सचिन वाजेयांच्या उलटतपासणीला सुरुवात झाली.
नेमकं काय घडलं उलटतपासणीत?
अनिल देशमुख यांचे वकील प्रश्न 1 :
मुंबई पोलीस दलात 2500 एपीआय आहेत? पण गृहमंत्री कधी व्यक्तीगत कोणाला ब्रिफिंग करतात का?
सचिन वाझेनी दिलेले उत्तर :
गृहमंत्र्यांचे आदेश असतील तर ते ब्रिफ्रिंग करता बोलावतात…गृहमंत्र्यांच्या आदेशावर सर्व अवलंबून असते
अनिल देशमुख यांचे वकील प्रश्न 2 :
तुम्ही कधी अनिल देशमुख यांना कार्यालयीन कामकाजा निमित्त भेटलात का?
सचिन वाझेनी दिलेले उत्तर :
कार्यालयीन संदेश प्राप्त झाला तेव्हा भेटलो, कार्यालयीन कामा करता भेटलो आहे
अनिल देशमुख यांचे वकील प्रश्न 3 :
कार्यालयीन कामा व्यतिरिक्त तुम्हाला कधी त्यांनी बोलावले आहे का? भेट झालीये का?
सचिन वाझेनी दिलेले उत्तर :
मला आठवत नाही
अनिल देशमुख यांचे वकील प्रश्न 4 :
तुम्ही कुंदन शिंदे याला ओळखतां का?
सचिन वाझेनी दिलेले उत्तर :
मी त्याला व्यक्तीगत ओळखत नाही… पण तो अनिल देशमुख यांचा खाजगी सचिव होता हे मला माहिती होते
अनिल देशमुख यांचे वकील प्रश्न 5 :
कुंदन शिंदे शी कधी आपले बोलणे झाले का?
सचिन वाझेनी दिलेले उत्तर :
मला आठवत नाही
अनिल देशमुख यांचे वकील प्रश्न 6 :
मंत्रालयात एखाद्या पोलीस मंत्रालयात जातो तेव्हा काय प्रक्रिया असते आत जाण्याची?
सचिन वाझेनी दिलेले उत्तर :
कार्यालयीन कामाकरता पोलिस जात असेल तर कोणतीही एन्ट्री म्हणते नोंद करता जेथे काम आहे तेथे जातो. पण जेव्हा खाजगी काम असेल तेव्हा पोलिसालाही नोंद करुन प्रवेश करावा लागतो.
सचिन वाझे याची उलट तपासणी झाल्यानंतर आजच्या न्यायालयीन चौकशी आयोगाच्या कामकाज थांबवण्यात आले आणि पुढील सुनावणी 13 डिसेंबरला दुपारी एक वाजता ठेवण्यात आली. तर सचिन वाझे याला त्याच्या वकील यांना भेटण्यासाठी तसेच आणि देशमुख यांना त्यांच्या वकिलांना आणि त्यांच्या वकिलाने भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, ED, Sachin vaze