Home /News /mumbai /

Right To Education अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशाला मुदतवाढ; ही आहे नवी डेडलाइन

Right To Education अंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशाला मुदतवाढ; ही आहे नवी डेडलाइन

सन 2021-22 करिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार निवड झालेल्या पाल्‍याचा प्रवेश घेण्‍यासाठी आता 9 जुलै, 2021 ही अंतिम तारीख

    मुंबई, 6 जुलै: बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 (Right to education) अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता पात्र खासगी विना-अनुदानित शाळांतील (अल्पसंख्याक शाळा वगळून) प्रवेशाच्या सुरुवातीच्या वर्गात (entry level) वंचित आणि दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी 25 टक्के जागा राखीव असतात. या राखीव जागांवर ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात येऊन प्रवेश दिले जातात. यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी राज्य स्तरावर लॉटरी काढण्यात आली होती. आरटीई 25 टक्के अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांना 30 जून 2021 पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा होता. मात्र, आता सदर प्रवेशासाठी 9 जुलै 2021 पर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी पालकांना प्रवेशाबाबत एसएमएस (SMS) पाठविण्यात आलेले आहेत. पाल्याच्या शिक्षणाची संधी जावू नये, यासाठी निवड यादीतील सर्व पालकांनी शाळेत जाऊन आपल्या पाल्याचे 9 जुलै 2021 पूर्वी प्रवेश निश्चित करावेत. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे / बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कारणांमुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि व्हॉट्सअप / ई-मेलद्वारे किंवा अन्य माध्यमांद्वारे बालकाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. तसेच शाळांनी देखील प्राथमिक स्तरावर प्राप्त झालेली प्रवेशाची कागदपत्रे पडताळणी समितीला दाखवून पडताळणी करुन प्रवेश निश्चित करावेत. प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांची यादी आरटीई पोर्टलवर उपलब्ध आहे. त्या यादीतील शाळेत प्रवेशासाठी अद्याप न आलेल्या बालकांच्या पालकांना दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे संपर्क करून त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही 9 जुलै 2021 पूर्वी पूर्ण करण्यात यावी, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    First published:

    Tags: Education, RTE

    पुढील बातम्या