मुंबई, 28 डिसेंबर : रतन टाटा यांचं नाव जगात कुणाला माहीत नसेल असा व्यक्ती नाही. प्रसिद्ध उद्योगपती टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचा आज वाढदिवस आहे. भारतातील एक प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा विशेषत: आपल्या सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. कोरोनाच्या काळात देखील रतन टाटा यांनी मोठं योगदान दिलं आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि सध्या टाटा समूहाचे अध्यक्ष असलेल्या रतन टाटा यांच्या आयुष्यात देखील अनेक चढ-उतार आले मात्र त्यांनी न डगमगता त्यांचा यशस्वीपणे सामना केला आणि एक यशस्वी उद्योगजग म्हणून आज जगभरात प्रसिद्ध आहेत.
रतन टाटा यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असताना त्यांचा एकदा खूप मोठा अपमान झाला. या अपमानाची धग त्यांच्या मनात कायम होती. याचा बदला बोलून नाही तर आपल्या चांगल्या कृतीनं करून दाखवण्याचा त्यांनी निश्चय केला आणि त्यांनी संपूर्ण जगाला करून दाखवलं. आज रतन टाटा यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसादिवशी आज आम्ही तुम्हाला त्यांचा एक फार प्रसिद्ध किस्सा सांगणार आहोत.
1988 रोजी रतन टाटा यांनी टाटा मोटर्सची इंडिका कार लॉन्च केली होती. हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं. रतन टाटा यांनी या प्रोजेक्टसाठी दिवस रात्र एक केले होते, मात्र काही कारणांमुळे त्यांना या प्रोजेक्टमध्ये यश मिळाले नाही. टाटा मोटर्सला मोठं नुकसान सहन करावं लागलं. नुकसान भरपाई करण्यासाठी शेअरहोल्डर्सने कंपनीना विकण्याचा सल्ला दिला.
रतन टाटा कंपनी विकण्याचा प्रस्ताव घेऊन अमेरिकेत फोर्ड मोटरच्या मुख्य ऑफिसमध्ये गेले. त्यांच्यासोबत कंपनीचे शेअर होल्डर्सही होते. फोर्ड कंपनीसोबत रतन टाटा यांची तीन तास मीटिंग चालली. यादरम्यान, फोर्डच्या चेअरमनने रतन टाटा यांचा अपमान करत म्हटले की, ‘जर तुला व्यवसायाचं कोणतंही ज्ञान नव्हतं तर तू ही कार लॉन्च करण्यासाठी एवढा पैसा का गुंतवला. आम्ही तुझी कंपनी विकत घेऊन तुझ्यावर उपकार करत आहोत.’ कंपनी विकावी लागणार या विचारानेच रतन टाटा दुःखी होते. त्यात या बोलण्यामुळे ते पुरते हलले. मीटिंग अर्ध्यावर सोडून ते भारतात परतले. यानंतर त्यांनी टाटा मोटर्स न विकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुन्हा एकदा शुन्यापासून उभे केले आणि यावेळी कंपनीला नफा झाला.
2008 पर्यंत टाटा मोटर्सचा नफा कित्येक पटींनी वाढला. तर फोर्ट कंपनी नुकसानात जाऊ लागली आणि लवकरच या कंपनीचं दिवाळं निघालं. फोर्डला सर्वात मोठं नुकसान रेंज रोवर आणि जग्वार या गाड्यांमुळे झालं होतं. रतन टाटा यांनी या दोन कंपन्या विकत घेण्याचा निर्णय घेतला. या डीलसाठी विल फोर्ड आणि त्यांचे काही शेअरहोल्डर्स भारतात आले होते, तेव्हा त्यांनी रतन टाटा यांना म्हटलं होतं की, ‘तुम्ही आमची कंपनी विकत घेऊन आमच्यावर फार मोठे उपकार करत आहात.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ratan tata