• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • रामनाथ कोविंद मुंबईत येऊनही 'मातोश्री'वर जाणार नाहीच!

रामनाथ कोविंद मुंबईत येऊनही 'मातोश्री'वर जाणार नाहीच!

मुंबई दौऱ्यावर येईनही रामनाथ कोविंद मातोश्रीवर जाणार नाहीत, त्यामुळे सेना-भाजपातले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आलेत.

  • Share this:
मुंबई, 15जुलै : भाजपप्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आज सकाळी साडे दहाच्या सुमारास मुंबईत दाखल झालेत. पण त्यांच्या कार्यक्रमापत्रिकेत 'मातोश्री भेटी'चा कुठेही उल्लेख नाही. किंबहुना ते मातोश्रीवर जाणारच नाहीत. मुंबईत आल्यानंतर  कोविंद विमानतळावरुन थेट मरीन ड्राईव्हच्या गरवारे क्लबमध्ये रवाना झालेत. तिथे ते भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि एनडीएमधील घटकपक्षांशी संवाद साधतील. त्याचा हा दौरा म्हणजे राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रचाराचा भाग मानला जातोय. कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरतेवेळीही शिवसेनेचा कुणीच प्रतिनिधी तिथे उपस्थित नव्हता. त्याला प्रत्युत्तर म्हणूनच भाजपकडून कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात मातोश्री भेटीचा समावेश करण्यात आला नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सेना-भाजपातले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आलेत. दरम्यान, कोविंद यांच्या मुंबई दौऱ्याची आम्हाला काहीच फिकिर नसल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीसाठी मात्र, शिवसेनेनं यापूर्वीच रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहिर केलेला आहे.
First published: