मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राजकारणी म्हणून नव्हे तर एक श्वानप्रेमी म्हणून चांगले सर्वश्रूत आहे. त्यांच्या घरीच अनेक वेगळ्या ब्रिडचे श्वानं आहे.
विरोधकांवर तुटून पडणाऱ्या राज ठाकरेंच्या व्यक्तीमत्वातला हा हळवा कप्पा पाहून बघणारे स्तब्ध झाले. डोबिंवलीत त्याच श्वानप्रेमाचं आगळवेगळं रुप दिसून आलं.
डोंबिवलीतील मनसे कार्यकर्ते राजू पाटील यांच्या घरी जात राज ठाकरेंनी रॅम्बो या ग्रेटडेन श्वानाची भेट घेतली.
राज ठाकरेंच्या लाडक्या जेम्स आणि बाँडचं हे पिल्लू तर आहेच…मात्र वर्षभरापूर्वी मृत्यू पावलेल्या बाँड आणि रॅम्बोमध्ये खूपच साम्य आहे.
मात्र 2015 मध्ये बाँड राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिलांच्या चेहऱ्याला चावल्यानं खळबळ उडाली. यानंतर बाँड, जेम्स आणि शॉन या तिन्ही ग्रेटडेन श्वानांची रवानगी कर्जतच्या फार्म हाऊसवर करण्यात आली.
रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठीही राज यांच्या गाडीत खास बिस्किटांचा डबा असतो. घरच्या सदस्यांप्रमाणेच पाळीव श्वानांचे वाढदिवसही साजरे होतात.
त्यामुळे राज ठाकरे या एका माणसाच्या मागे एक कणखर राजकारणी, एक हरहुन्नरी कलाकार आणि एक हळवा श्वानप्रेमी असे अनेक चेहरे आहेत याचं दर्शन पुन्हा एकदा जगाला झालंय.
राज ठाकरे जेव्हा निघाले होते तेव्हा त्यांनी लाडक्या रॅम्बोला लाडाने टाटाही केला आणि रॅम्बोनेही मान हलवून जणू टाटा केला.