प्रमोद पाटील, कर्जत, 22 जुलै : गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रायगडमध्ये इर्शाळवाडीत भूस्खलनामुळे २५ हून अधिक घरं जमिनीखाली गाडली गेली. या दुर्घटनेनंतर आणखी काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. संकटांची मालिका सुरूच असताना आता आणखी एक धोका निर्माण झाला आहे. कर्जत तालुक्यात असलेल्या सोलनपाडा धरणाला गळती लागली आहे. हे धरण फुटण्याची भीती स्थानिकांमधून व्यक्त केली जातेय. सोलनपाडा इथं जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाचं धरण आहे. या धरणाच्या बांधातून गळती सुरू आहे. सोलनपाडा धरणाच्या बांधातून सुरू असलेली गळती रोखण्यासाठी याआधी दुरुस्तीचं कामही करण्यात आलं होतं. मात्र हे काम केल्यानंतरही गळती सुरूच आहे. त्यामुळे आता हे धरण फुटण्याची भीती स्थानिकांमध्ये आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार; उभं पीक पाण्याखाली, गावांना पुराचा वेढा, कुठे किती नुकसान? रायगड जिल्हा परिषदेने १९८० मध्ये जामरूख भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सोलन पाडा येथे सोलनपाडा धरण बांधले. मात्र, धरणाच्या बांधामधून पाण्याची गळती सुरूच होती. त्यामुळे पावसाळा आला आणि पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला की, पाण्याच्या गळतीमुळे धरण कधीही फुट्न दुर्घटना होऊ शकते. या भीतीने आता ग्रामस्थांची झोप उडाली आहे. पाटबंधारे उच्चस्तर विभागाला कळवले असून गळती रोखण्याचे काम सुरु आहे. देवा महाराष्ट्रावर रुसला का? इगतपुरीजवळ किल्ला धसला, घटनेचा LIVE VIDEO इर्शाळवाडी दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच नाशिकमधला धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील इतिहासकालीन कावणई किल्ला धसला आहे. कावणईच्या डोंगरावर असलेला हा किल्ला आहे. बिटुरली गावाच्या बाजूने काही प्रमाणात हा किल्ला धसला आहे. यामध्ये किल्ल्याचं किती नुकसान झालं आहे, याची माहिती अजून समोर आली नाही. इर्शाळवाडीच्या जवळच असलेल्या मोरबेवाडीमध्येही आज दरड कोसळली आहे. दरड कोसळल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मोरबेवाडीमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.