मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई, घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग घेणार्‍या तब्बल 31 जणांना अटक

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई, घोड्यांच्या शर्यतीवर बेटिंग घेणार्‍या तब्बल 31 जणांना अटक

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली.

पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली.

पुणे, 14 डिसेंबर : पुण्यात घोड्याच्या रेसिंगवर बेकायदेशीरपणे ऑनलाईन बेटिंग घेणाऱ्या बुकींच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकले आहेत. या प्रकरणी 31 आरोपींना अटक करण्यात आली असून पुणे शहरातील वानवडी, मुंढवा, हडपसर भागात हे बेटिंगचे अड्डे चालवले जात होते. या कारवाईत 31 मोबाईल्स, 6 लॅपटॉप्स आणि रोकड असा मिळून पावणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती दिली. या कारवाईमध्ये काही बड्या बुकींना तसेच खेळायला येणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी तब्बल 31 जणांना अटक करण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राइव्ह, लॅन्डलाईन फोन आणि इतर ऐवज जप्त केला आहे. विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी फिर्याद दिली असून मुख्य आरोपी शब्बीर मोहसीन खंबाटी (रा. पद्मव्हिला सोसायटी, वानवडी) याला अटक करण्यात आली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर मुंबईमधील रेसकोर्सवर कोरोना क्वारंटाईन सेंटर तयार करण्यात आल्याने तेथील शर्यती पुण्यात होत आहे. रेसकोर्समध्ये शासकीय परवाना घेतल्यानंतरच सर्व टॅक्स भरून बेटिंग घेणार्‍यांना परवाना दिला जातो. मात्र, काही जण टीव्हीवर शर्यती पाहून त्यावर ऑनलाइन बेटिंग घेत होते. घोड्यांच्या शर्यतीवर मोठया प्रमाणावर बेटिंग घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हडपसर, कोंढवा आणि वानवडी परिसरात छापे टाकले. पोलिसांनी बेटिंग घेण्यासाठी वापरल्या जाणारे साहित्य तसेच मोबाईल असा एकुण 55 हजार 500 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune (City/Town/Village), Pune news

पुढील बातम्या