मुंबई, 9 जून : आजच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सून कोणताही विलंब न करता प्रगती करत आहे आणि येत्या 48 तासात महाराष्ट्रात पोहोचेल, असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर गेल्या काही वेळापासून मुंबईसह उपनगरात (Pre-monsoon) पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट सुरू असून प्री मान्सूनमुळे नागरिक सुखावले आहेत. उष्णतेमुळे अंगाची काहीली होत असताना पावसामुळे नागरिक सुखावले आहेत. सोशल मीडियावरही मुंबईकरांनी आनंद व्यक्त करीत अनेक व्हिडीओही शेअर केले आहेत.
It's finally here #MumbaiRains #mumbairain pic.twitter.com/rgfjn7S56M
— GunnerRane (@tejarane) June 9, 2022
48 तासात महाराष्ट्रभरात पाऊस.. 31 मे ते 7 जून दरम्यान मान्सूनने दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, (Arabian sea) संपूर्ण केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूचा काही भाग व्यापल्याचे वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ आर के जेनामानी यांनी सांगितले. मान्सूनच्या वाटचालीस कोणताही विलंब झालेला नाही. येत्या दोन दिवसांत तो महाराष्ट्रात पोहोचेल आणि त्यानंतरच्या दोन दिवसांत मुंबई व्यापेल, हवामान विभागाचे अधिकारी जेनामनी म्हणाले. आम्हाला खात्री आहे की पुढच्या 48 तासांत मान्सून राज्यात दाखल होणार आहे. दरम्यान त्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात मान्सून वारे वाहत आहे. तसेच ढग तयार होऊ लागल्याने मान्सूनला जास्त काळ लागणार नसल्याचे जेनामनी यांनी सांगितले. मान्सून पूर्व पावसाने कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात 60 किमी वेगापर्यंतचे वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तवण्यात आल्याने 8 ते 10 जून या कालावधीत समुद्रात मासेमारीस जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.