• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • शिवाजी पार्कवर प्रकाश आंबेडकरांची सभा, उमेदवारांची घोषणा करणार?

शिवाजी पार्कवर प्रकाश आंबेडकरांची सभा, उमेदवारांची घोषणा करणार?

सभेत उमेदवारांच्या घोषणेशिवायच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत जाण्यासंदर्भात देखील प्रकाश आंबेडकर अंतिम भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 फेब्रुवारी : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीसाठी काही उमेदवारांची घोषणा करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमद्वारे स्थापित केलेल्या वंचित बहुजन आघाडीची मुंबईत मोठी सभा होत आहे. या सभेत उमेदवारांच्या घोषणेशिवायच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत जाण्यासंदर्भात देखील प्रकाश आंबेडकर अंतिम भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आत्तापर्यंत जाहीर केलेले उमेदवार सातारा - सहदेव आयवळे माढा - विजय मोरे सांगली - जयसिंग शेंडगे बारामती - नवनाथ पडळकर पुणे - विठ्ठल सातव सर्व जागा लढवणार याआधी 3 फेब्रुवारीला प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष महाराष्ट्रातील सर्व 48 जागा लढवणार आहे अशी घोषणा केली होती. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीची स्थापणा केली आहे. ही आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण भाजपविरोधातील मतांमध्ये यामुळे विभागणी होईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. काय आहे आंबेडकरांची मागणी? 'काँग्रेसकडून आघाडीचा कोणताही प्रस्ताव आजवर आला नसून जोवर आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत जागांची चर्चा होणार नाही' असं भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं. तसंच 'काँग्रेस जर 12 जागा देणार नसेल तर वंचित बहुजन आघाडी राज्यातील 48 जागांवर तयारी पूर्ण झाली असून आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोर जाऊ,' असा इशाराही आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला होता. VIDEO : 'बाळासाहेब ठाकरे मर्द तर उद्धव घुटनेटेकू', अबू आझमींची जहरी टीका
  First published: