मुंबई 1 एप्रिल : दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘तब्लिकी जमात’मुळे देशभर कोरोनाच्या संक्रमणाचा धोका वाढला. त्याची आता देशभर चर्चा सुरू आहे. अशाच प्रकारचा कार्यक्रम पालघरमध्ये होणार होता. सुरूवातीला पालघर पोलिसांनी त्याला परवानगी दिली होती. मात्र नंतर जेव्हा कोरोनाचा धोका वाढला त्यामुळे पोलिसांनी नंतर परवानगी नाकारली होती. त्यामुळे तो कार्यक्रम रद्द झाला. या जमातमध्येही विदेशातून अनेक जण सहभागी होणार होते. त्याच बरोबर मुंबईसह महाराष्ट्रातूनही त्यात शेकडो लोक सहभागी होणार होते. तसं झालं असतं तर कोरोनाच्या संकटात आणखी भर पडली असती. दिल्लीत एका चुकीमुळे देशभर कोरोनाचा प्रसार झाला. दिल्लीतल्या जमातमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांची तपासणी करून त्यांना आता क्वारंटाइन केलं जात आहे. दिल्लीतील निजामुद्दीन परिषदेमुळे भारतातील कोरोनाचा धोका आता अधिकच वाढला आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेलेही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. या परिषदेमुळे शेकडो लोकांना या व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तबलिगी जमातमध्ये सहभागींच्या तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर मशिदीतून दगडफेक
एकट्या दिल्लीतच तब्बल 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, जे या परिषदेत सहभागी झाले होते, दिल्ली सरकारने तशी माहिती दिली आहे.
मशिदीतील 7 इंडोनेशियनसह 37 लोक ताब्यात, पैकी 9 जणांचा निजामुद्दीन तब्लिगीत सहभाग
संध्याकाळपर्यंतची आकडेवारी पाहता मरकझशी संबंधितांच्या संपर्कात आलेल्या 154 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं आहे. यामध्ये दिल्लीत 18 प्रकरणं होती, जी आता 53 झाली आहेत तर जम्मू-काश्मीरमध्ये 23, तेलंगणा, 20, आंध्र प्रदेश, 17, अंदमान-निकोबार 9, तामिळनाडू 65 आणि पद्दुचेरीमध्ये 2 कोरोनाव्हायरसचे रुग्ण आहेत.

)







