मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai: परमबीर सिंह यांनी 24 लाखांचे भाडे थकवले, कारवाईची शक्यता

Mumbai: परमबीर सिंह यांनी 24 लाखांचे भाडे थकवले, कारवाईची शक्यता

Param bir singh may face action: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लाखो रुपयांचे भाडे थकवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Param bir singh may face action: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लाखो रुपयांचे भाडे थकवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Param bir singh may face action: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लाखो रुपयांचे भाडे थकवले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मुंबई, 22 जुलै: लेटरबॉम्ब टाकून अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी प्रति महिना कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) अडचणीत येण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त (Thane Police Commissioner) असताना मलबार हिल (Malabar Hill, Mumbai) परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहत होते. या अपार्टमेंटमध्ये राहत असताना त्यांनी त्याचं भाडे दिले नसल्याचा (not paid rent) त्यांच्यावर आरोप आहे.

रिपोर्ट्सनुसार, परमबीर सिंह हे 18 मार्च 2015 मध्ये ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्त झाले. त्यापूर्वी ते मुंबईत स्पेशल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे अॅडिशनल डीजीपी होते. या काळात परमबीर सिंह यांना मलबार हिल्स परिसरातील बीजी खेर मार्गावर असलेले निलिमा अपार्टमेंट हे सरकारी निवासस्थान वास्तव्यास देण्यात आले होते. यानंतर त्यांची नियुक्त ठाणे पोलीस आयुक्तपदी झाली. त्यांना ठाण्यात सरकारी निवासस्थान मिळाले असताना सुद्धा त्यांनी निलिमा अपार्टमेंट खाली केलं नाही.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, परमबीर सिंह यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून 17 मार्च 2015 ते 29 जुलै 2018 पर्यंतचे घरभाडे आणि पेनल्टी जोडून सुमारे 54.10 लाख रुपये थकित देणे आहे. एका रिपोर्टनुसार, 35 आयपीएस अधिकाऱ्यांवर जवळपास 4 कोटी रुपये घरभाडे आणि पेनल्टी दिली नसल्याची माहिती आहे. नियमानुसार एकाचवेळी दोन सरकारी निवासस्थान अधिकाऱ्यांना वापरता येत नाही.

VIDEO: बदलापुरात मुसळधार पाऊस; उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सोसायट्यांमध्ये गुडघाभर पाणी

अधिकाऱ्यांची पोस्टिंग समाप्त झाल्यावर 15 दिवसांत राहत असलेले सरकारी निवासस्थान सोडण्यासाठी सूट मिळते. या काळात सरकार केवळ लायसन्स फी आकारते. जर या 15 दिवसांत अधिकाऱ्यांनी आपले निवासस्थान खाली केलं नाही तर सरकार त्यांच्याकडून भाडे आणि पेनल्टी दोन्ही वसुल करते.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुठल्याही अधिकाऱ्याला दोन सरकारी निवासस्थानात राहता येत नाही. आम्ही हे थकीत घरभाडे आणि पेनल्टी त्यांच्या पगारातून कापून घेऊ आणि जर हे शक्य झाले नाही तर आम्ही जून 2022 मध्ये त्यांच्या निवृत्तीनंतर ही रक्कम वसुल करु.

First published:

Tags: Mumbai, Paramvir sing