Home /News /mumbai /

मुंबईला बदनाम करण्याचा कट रचला जातोय, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

मुंबईला बदनाम करण्याचा कट रचला जातोय, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

जितेंद्र आव्हाड यांनी गुजरातकडे बोट दाखवत मुंबईचे लचके तोडण्यासाठी काही जण टपून बसले असल्याचा घणाघात केला आहे.

    मुंबई, 11 मे : कोरोना व्हायरसच्या संकटकाळात पुन्हा एकदा प्रादेशिक वाद उफाळून आला आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांचं (IFSC) मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवल्यानंतर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. तसंच यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी गुजरातकडे बोट दाखवत मुंबईचे लचके तोडण्यासाठी काही जण टपून बसले असल्याचा घणाघात केला आहे. 'आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला बदनाम करण्याचा कट पद्धतशीरपणे रचला जात आहे, हे दिसून येतंय आणि मुंबईचा लचका तोडण्यासाठी टपून बसलेले लोक अजूनही या देशात आहेत आणि त्यांचं घर आपल्या बाजूलाच आहे,' अशा आशयाची फेसबुक पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आव्हाड यांच्या या आक्रमक टीकेनंतर आता राजकीय क्षेत्रात काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावं लागेल. कोरोनाला हरवून जितेंद्र आव्हाड पुन्हा मैदानात जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना व्हायरसवर यशस्वी मात केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती आता ठणठणीत असून ते सध्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आव्हाड यांना प्रथम ज्युपिटर रुग्णालयात आणि श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानंतर फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. अखेर त्यांना गुरूवारी (7 मे) डिस्चार्ज देण्यात आला. आपला नेता ठणठणीत बरा झाल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, समर्थकांनी समाधान व्यक्त केलं. संकलन, संपादन - अक्षय शितोळे
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Jitendra awhad

    पुढील बातम्या