जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / आर्यन खान प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई

आर्यन खान प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई

आर्यन खान

आर्यन खान

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणाचा एनसीबीच्या तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 मे : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. आर्यन खानला कार्डेलिया क्रूजवरून एनसीबीने 02 ऑक्टोबर 2021 ला अटक केली होती. एनसीबीतील अधिकारी विश्वविजय सिंग यांना बडतर्फ करण्यात आलं. त्यांच्याशिवाय विश्वनाथ तिवारी यांच्यावरही बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. दोघांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये बडतर्फ करण्यात आलं आहे. विश्वनाथ तिवारी यांनी विनापरवानगी परदेशवारी केल्याचा आरोप आहे तर विश्वविजय सिंग यांना 2018 च्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश राकेश अस्थाना यांनी दिले होते. बहिणीला पहिल्यांदाच आली मासिक पाळी, भावाने अज्ञानातून घेतला संशय; केला खून एनसीबीच्या मुंबईच्या टीम विरोधातील आरोपानंतर कार्डेलिया छापा प्रकरणी वेगळी चौकशी केली गेली होती. ही चौकशी नोव्हेंबर 2021 मध्ये संपली. यानंतर सात अधिकाऱ्यांविरोधात विभागीय कारवाई सुरू होती. पण या चौकशीत काय झालं हे समोर आलेलं नाही. आर्यन खानसह इतरांना एनसीबीकडून ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. व्हॉटसअॅप चॅटच्या आधारे ड्रग्ज तस्करीचा आरोप करण्यात आला होता. पण सबळ पुराव्या अभावी आर्यन खानला 28 ऑक्टोबर 2021 रोजी जामीन दिला होता. एनसीबीने छाप्याची चौकशी करण्यासाठी उप महासंचालक संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली होती. यामध्ये एसआयटीला आरोप सिद्ध करण्यासाठी छाप्यात आर्यन खान ड्रग्ज तस्करी करत असल्याचे सबळ पुरावे सापडले नाहीत. त्यानंतर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: aryan khan , Drugs , NCB
  • First Published :
जाहिरात
जाहिरात