मुंबई, 27 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरील आरोपांची मालिका सुरुच आहे. नवाब मलिक यांनी सकाळीच ट्विट्स करत समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या निकाहचा फोटो ट्विट करत हा निकाह कधी आणि कुठे झाला होता याची माहिती दिली आहे. हा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी म्हटलं, “स्वीट कपलचा फोटो - समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना.”
Photo of a Sweet Couple
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 27, 2021
Sameer Dawood Wankhede and Dr. Shabana Qureshi pic.twitter.com/kcWAHgagQy
तर दुसऱ्या ट्विटमध्ये नावब मलिकांनी म्हटलं, समीर दाऊद वानखेडेच्या पहिल्या लग्नाचा निकाह नामा लवकरच सादर करत आहे. यासोबतच नवाब मलिक यांनी रात्री एक ट्विट करत म्हटलं होतं, ‘इब्तिदा-ए इश्क है रोता है क्या, आगे-आगे देखिए होता है क्या !’ हे ट्विट करत नवाब मलिकांनी एक सूचक इशाराच दिला होता.
Presenting shortly the 'Nikah Nama' of the first marriage of
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 27, 2021
'Sameer Dawood Wankhede'
दरम्यान आज सकाळी पुन्हा एकदा नवाब मलिक एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत आता नवाब मलिक कुठला गौप्यस्फोट करतात हे पहावं लागणार आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक यांच्याकडून वारंवार एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्या विरोधात वेगवेगळे आरोप करुन गौप्यस्फोट करत असल्याचं पहायला मिळत आहे. वाचा : समीर वानखेडेंविरोधात राज्य सरकारचे मोठे पाऊल, नवाब मलिक-मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतर हालचालींना वेग पंच प्रभाकर साईल चौकशीच्या फेऱ्यात मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात पंच असलेले प्रभाकर साईल हे आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांकडून आर्यन खान प्रकरणात पैसे उकळण्याचा गंभीर आरोप प्रभाकर साईल नेकेला होता. त्यानंतर प्रभाकर साईल यांची चौकशी सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांनी प्रभाकर साईल यांचा जबाब नोंदवला आहे. प्रभाकर साईल यांच्या चौकशीसाठी एनसीबीचं पथक दिल्लीहून मुंबईला येणार आहे. 28 ऑक्टोबर रोजी प्रभाकर साईल याला चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या संदर्भात सम्न्सही पाठवण्यात आलं आहे. प्रभाकर साईलनं काय केलेत आरोप प्रभाकर साईल यांनी NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. आरोप करणारा प्रभाकर स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे. केपी गोसावी हा जो व्यक्ती आहे ज्याचा फोटो आर्यन खानसोबत व्हायरल झाला आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावीनं शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची मागणी केली असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यात धक्कादायक म्हणजे त्यात 18 कोटींवर डील झाली आहे. हा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी दिली आहे. प्रभाकरनं आरोप केला आहे की, केपी गोसावीला 25 कोटींबद्दल बोलताना ऐकलं होतं आणि ते डील 18 कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याचं फायनल झालं होतं. तसंच प्रभाकरचा दावा केला आहे की, त्या डीलपैकी त्यातले 8 कोटी रुपये एनसीबीच्या अधिकाऱ्यांना द्यायचे आहेत असं बोलणं सुरू होतं. क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे 15 मिनिटं निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिलं असल्याचा दावाही प्रभाकरनं केला आहे. त्यानंतर गोसावीनं आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितलं. एनसीबीने त्याला 10 साध्या कागदांवर सही करून घेतल्याचंही त्यानं म्हटलं आहे. आपण गोसावी यांना 50 लाख रोख रक्कम भरलेल्या 2 पिशव्या दिल्या. तसंच 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9.45 वाजता गोसावीनं फोन केला आणि 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितलं, असंही प्रभाकर साईल यानं सांगितलं आहे. गोसावीनं आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असं प्रभाकरनं म्हटलं आहे.

)







