धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 16 मे : कपडे हा पुरुष आणि महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. साडी, लेहेंगा, स्कर्ट, ब्लाऊज, वनपीस हे सर्व प्रकार महिलांना आवडतात. तर शर्ट, पँट, कुर्ता, थ्री पीस, कोट, जॅकेट असे विविध प्रकार पुरुषांच्या आवडीचे आहेत. मुंबई मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पण होलसेल दरामध्ये कपडे मिळतात. मात्र, तुम्हाला तुमच्या शरीरानुसार फिट कपडे हवे असतील तर ते शिवून घ्यावे लागतात. पण स्वस्त दरात कुठे शिलाई केली जाते माहिती आहे का? हीच माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कुठे केली जाते शिलाई? सध्या लग्न, सण उत्सव सुरू आहेत. अश्यातच सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण पोशाख परिधान करतो. अनेक जण आपल्या शरीराच्या अंगकाठी नुसार कपडे शिवून घेणं पसंद करतात. मात्र अनेक ठिकाणी शिलाई खिशाला परवडणारी नसते. त्यामुळे इच्छा असूनही रेडिमेड कपडे परिधान करावे लागतात. मात्र, तुम्हाला शिवून कपडे घ्यायचे असतीलतर नवी मुंबईतील न्यु पनवेलमध्ये असलेल्या गणेश मार्केटमध्ये कपडे शिवून घेऊ शकतात. गेल्या 25 वर्षापासून एकाच छताखाली अनेक दुकानदार या ठिकाणी शिलाईच काम करत आहेत.
काय आहे शिलाईची किंमत? या मार्केटमध्ये महिला, पुरुष, लहान मुलं यांची कपडे शिवली जातात. पुरुषांसाठी शर्ट-पँट, कुर्ता-पायजमा, थ्री पीस - टू पीस, कोट, मोदी जॅकेट, तर महिलांसाठी लेहेंगा, ब्लाऊज, वनपीस, पंजाबी ड्रेस, सद्याच्या ट्रेण्ड नुसार कोणत्याही प्रकारची कपडे इथं शिवून मिळतात. याठिकाणी 350 रुपयांपासून शिलाईची सुरुवात आहे. 25 वर्षापासून आहे मार्केट या मार्केटमध्ये महिला पुरुष यांचे कपडे शिवले जातात. त्याच बरोबर शिलाईसाठी लागणार साहित्य देखील या ठिकाणी मिळत. 25 वर्षापासून हे मार्केट आहे. या ठिकाणी एकंदरीत 50 च्या जवळपास दुकान आहेत. पुरुषांच्या कपड्याची शिलाई 350 पासून तर महिलांच्या कपड्याची शिलाई 200 रुपयांपासून सुरुवात होते, असं साई श्रद्धा दुकानाच्या मालक स्वाती शर्मा यांनी सांगितले.
पूर्ण पत्ता नवी मुंबईच्या न्यू पनवेल येथील सेक्टर 19, परीसरात गणेश मार्केट आहे.