मुंबई, 12 ऑगस्ट: Nag Panchami 2021 Facebook WhatsApp Marathi Messages: श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी. नागपंचमीपासून सण-उत्सवांची सुरुवात होते. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागाच्या 12 रुपांची पूजा केली जाते. नागदेवतासोबतच भगवान शंकराची पूजा करणं अत्यंत फलदायी मानले जाते. श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी (Nag Panchami) साजरी करण्यात येते. यंदा 13 ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे.
नागपंचमीच्या दिवशी तांदूळ, माती, गोबरच्या सहाय्याने नागदेवताची प्रतिमा काढण्यात येते. तर काहीजण रांगोळीच्या मदतीने सुद्दा नागदेवताची प्रतिमा काढतात आणि मग त्याचे पूजन करतात. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांना नियमांचे पालन करुनच सण-उत्सव साजरे करण्यात येत आहेत. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणींना नागपंचमीच्या शुभेच्छा देऊ शकतात. नागपंचमीच्या शुभेच्छा देणारे काही मेसेजेस सोशल मीडियात व्हायरल (Nag Panchami Marathi Messages) होत आहेत. सोशल मीडियात व्हायरल होणारे हेच मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पाहूयात नागपंचमीच्या शुभेच्छा देणारे काही खास मराठी मेसेजेस.
नागपंचमीसाठी शुभ मुहूर्त
हिंदू धर्मानुसार प्रत्येक सण-उत्सवासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. नागपंचमीच्या पूजेसाठी 13 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजून 49 मिनिटांपासून ते 8 वाजून 28 मिनिटांचा वेळ पूजा करण्यासाठी शुभ आहे.
नागपंचमीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस (Nag Panchami 2021 Messages in Marathi)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.