मुंबई, 8 मार्च : एकीकडे राज्यात काही ठिकाणी वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना मुंबईत सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली. मुंबई शहराच्या IMD सांताक्रूझ वेधशाळेने सोमवारी कमाल तापमान 39.3°सेल्सिअस नोंदवले. हे तापमान देशातील सर्वोच्च तापमान होते, असे वेधशाळेने म्हटले आहे.
17 वर्षातील पहिली गारपीट -
सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत पाऊस, गडगडाट आणि विजांचा कडकडाट झाला. दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी वादळी पावसाने नुकसान झाले आहे. यासोबतच गोराई सारख्या एमएमआरच्या काही भागांतील गारपिटीची नोंद केली. ही मागच्या 17 वर्षांतील मुंबई प्रदेशात नोंदलेली पहिली गारपिट असू असू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
वैगरीज ऑफ द वेदर या खासगी हवामान अंदाज ब्लॉगचे मुक्त हवामानशास्त्रज्ञ राजेश कपाडिया यांनी सांगितले की, 9 मार्च 2006 रोजी मुंबईत पहिल्यांदा गारपीट झाली. सोमवारी मुंबई हे भारतातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. याबाबत कपाडिया म्हणाले की, दिवसाचे तापमान एका दिवसाआधीच्या 38.1oC वरून सोमवारी 39.3oC वर आले होते, जे कोणत्याही ब्रेकशिवाय होते.
IMD शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी तापमानात तीव्र वाढ होण्याचे श्रेय, पूर्वेकडील प्रदेश आणि समुद्राच्या वाऱ्याला उशीर होण्याला दिले. 17 मार्च 2011 रोजी मार्चमध्ये नोंदवलेले सर्वकालीन उच्च दिवसाचे तापमान 41.6oC होते.
सोमवारी संध्याकाळपासून संपूर्ण शहरात ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट पाहायला मिळाला. यानंतर पावसानेही हजेरी लावली आणि मंगळवारी मुंबई विभागातील बहुतांश भागात ढगाळ आकाश दिसले. काही भागात हलक्या पावसाचीही नोंद झाली. आयएमडी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारचा पाऊस असामान्य नाही. कारण मार्च हा मान्सूनपूर्व कालावधी म्हणून ओळखला जातो. मुंबईत आता आणखी पाऊस पडण्याची शक्यता नाही, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heat, Mumbai, Rise in temperatures, Weather Update