शिवाजी पार्कमध्येच होणार बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक

शिवाजी पार्कमध्येच होणार बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात करण्याचे निश्चित झाले असून, जानेवारी-2019 मध्ये भूमिपूजन होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात करण्याचं निश्चित झालं असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी-2019 मध्ये स्मारकाचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच कारणास्तव महापौरांचं निवास भायखळा येथे हलविण्यात आलं असून, डिसेंबर महिन्यात ते भायखळ्यातील राणीच्या बागेतील बंगल्यात रहायला जाणार आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले. शिवसेनेच्या दृष्टीने दादरच्या शिवाजी पार्क परिसराला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे बाळासाहेबांचं स्मारक याच परिसरात व्हावं, अशी ठाकरे कुटुंबियांसह समस्त शिवसैनिकांची इच्छा होती.

स्मारकासाठी मुख्य सचिवांच्या समितीने चार-पाच जागाही सुचविल्या होत्या. त्यामध्ये दादर येथील महापौरांचा बंगला, नायगाव आणि दक्षिण मुंबईतील जागाही सुचविण्यात आल्या होत्या. स्मारकाचा रखडलेला प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीकोनातून उद्धव ठाकरे सांगतील, ती जागा देण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शविली होती.

हे स्मारक शिवसेनाप्रमुखांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे दर्शन घडविणारे आणि भव्यदिव्य असावे, अशी शिवसेनेची भूमिका होती. त्यासाठी स्मारकासाठीची जागा समिती किंवा ट्रस्टला देऊन उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार स्मारकाचे काम व्हावे, त्यादृष्टीने वास्तुविशारद आणि अन्य सदस्यांच्या नियुक्त्या व्हाव्यात, असा शिवसेनेचा आग्रह होता.

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कध्ये उभारण्यात येणार आहे. नव वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी-2019 मध्ये स्मारकाचं भूमिपूजन होणार असल्याने मुंबईचे महापौर येत्या डिसेंबर महिन्यात भायखळ्यातील जिजामाता उद्यानात (राणीच्या बागेतील) बंगल्यात रहायला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नक्षली हल्ला- पत्रकारासमोर उभा ठाकलेला मृत्यू, आईसाठी रेकॉर्ड केला भावूक VIDEO

First published: October 31, 2018, 7:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading