• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुंबईतील 'निर्भया'चा मृत्यूनंतर चित्रा वाघ रडल्या, म्हणाल्या...''सावित्रीच्या लेकी म्हणवून घेताना नाही वाचवू शकलो तुला''

मुंबईतील 'निर्भया'चा मृत्यूनंतर चित्रा वाघ रडल्या, म्हणाल्या...''सावित्रीच्या लेकी म्हणवून घेताना नाही वाचवू शकलो तुला''

या पीडितेच्या मृत्यूनंतर भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 11 सप्टेंबर: मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital Mumbai) पीडित महिलेवर उपचार सुरू होते. या महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. पीडित महिला अद्यापही बेशुद्धावस्थेत होती. या पीडितेच्या मृत्यूनंतर भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांना अश्रू अनावर झाले. अक्षरशः त्या ढसाढसा रडल्या. पीडित महिलेची विचारपूस करण्यासाठी चित्रा वाघ जात होत्या. त्यांनी तशी माहिती ट्विट करुन दिली होती. मात्र त्या जाण्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला. मी आता निशब्द झाले असून माझ्याकडे यावर बोलायला काही शब्द नाहीत. ज्या पद्धतीने एका महिलेवर अत्याचार करण्यात आले तो राक्षसी होता. मी डॉक्टरांसोबत माझं बोलणं झालं. मी पीडितेला त्या ठिकाणी बघून आले. अक्षरश: तिचे आतडे कापले गेले. तसंच तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला. ज्या पद्धतीनं महिलांवर अत्याचार सुरु आहेत. ते कुठेतरी थांबायला पाहिजे. आता आमचे शब्द संपले असून राज्यातल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, असं चित्रा वाघ म्हणाल्यात. चित्रा वाघ यांचं ट्विट , साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणंदेणं नाही त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून १ नंबर लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना नाही वाचवू शकलो तुला. अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार पीडित मुलगी ७महिन्यांची गर्भवती भीतीपोटी पीडितेने गळफास लावून संपवली जीवनयात्रा निशब्द आहे मी अत्याचाराच्या घटना संपतचं नाहीयेत रोजचं सुरूहे अमरावतीच्या मुलीने जीवन संपवलं तर मुंबईतील महिला मृत्युशी लढतीये. सावित्रीच्या लेकींची फरफट कुठपर्यंत, चित्रा वाघ यांचं दुसरं ट्विट. नेमकं प्रकरण काय? पीडित महिलेला मारहाण करुन आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता. इतकेच नाही तर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकून गंभीर दुखापत केली होती. आरोपीने केलेल्या या कृत्त्यात पीडित महिलेची अवस्था खूपच चिंताजनक होती. आरोपीने भररस्त्यात उभ्या असलेल्या टेम्पोत हे कृत्य केलं होतं आणि त्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: