मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईतील रस्त्यांची चाळण; रोज 6 खड्डेबळी, खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात वाढ

मुंबईतील रस्त्यांची चाळण; रोज 6 खड्डेबळी, खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात वाढ

मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा रस्त्यांची (Road) चाळण झालेली पाहायला मिळत आहे. हे खड्डे मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा रस्त्यांची (Road) चाळण झालेली पाहायला मिळत आहे. हे खड्डे मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा रस्त्यांची (Road) चाळण झालेली पाहायला मिळत आहे. हे खड्डे मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

मुंबई, 08 ऑगस्ट: मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा रस्त्यांची (Road) चाळण झालेली पाहायला मिळत आहे. मुसळधार (Heavy Rain) पावसानंतर मुंबईत खड्ड्यांची समस्या उद्भवली आहे. या खड्ड्यांमुळे (Potholes) होणारे अपघात (Accident) आणि वाहतूक कोंडीला (Traffic) मुंबईकर सामोरे जात आहेत.

मुंबईत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 2016 ते 2019 या काळात एकूण 10 हजार 76 नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या खड्ड्यांमुळे दररोज 6 लोकांचा मृत्यू होत असल्याचा अहवाल काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं दिला होता. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये यात वाढ झाली आहे. 2019 मध्ये 2 हजार 140 नागरिकांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला आहे. 2018 मध्ये हा आकडा 2 हजार 15 असा होता. दरम्यान 2020 च्या अपघातांचा अहवाल अद्याप तयार झालेला नाही.

जून जुलैमध्ये दरवर्षी मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या रस्त्यांची नेहमीच चाळण होते. सध्या चेंबूर ते सीएसएमटी, वांद्रे ते दहिसर तसंच कुर्ला ते ठाणे या मुख्य रस्त्यांवर छोटे - मोठे खड्डे पडले. लालबहादूर शास्त्री मार्ग, शहरातील अंतर्गत जोडरस्ते, गल्ल्या, स्थानिक विभागातही बरेच पडलेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा 'हा' बडा नेता गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात

एवढंच काय तर मुंबईतल्या उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत. पेव्हर ब्लॉकचे रस्तेही खचलेले आढळून आले. खड्ड्यांमुळे वाहन चालक खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे अपघात होत आहेत. बाईक चालकांना जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागत आहे.

मुंबईतले हे रस्ते खड्डेमय

सायन

धारावी

दादर

परळ

लालबाग

भायखळा

वांद्रे

सांताक्रुझ

अंधेरी

डी. एन. नगर

भांडूप

घाटकोपर

विक्रोळी

सायन भायखळा मार्गावरील परळ पुलावर सर्वाधिक खड्डे पडले असून माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरच्या पुलाचीही हीच अवस्था आहे. गोरेगाव येथील मृणालताई गोरे मार्गाकडे जाणारा रस्ता, ओशिवरा ते डी. एन. नगर मार्ग, मुलुंड चेकनाका या परिसरातील खड्ड्यांसंदर्भात तक्रारी नागरिक करत आहेत.

First published:

Tags: Mumbai, Rain