जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / ...आणि 'तो' थेट एकामागे एक गाड्यांना धडक देत गेला, मरिन ड्राईव्ह हादरलं! पाहा VIDEO

...आणि 'तो' थेट एकामागे एक गाड्यांना धडक देत गेला, मरिन ड्राईव्ह हादरलं! पाहा VIDEO

...आणि 'तो' थेट एकामागे एक गाड्यांना धडक देत गेला, मरिन ड्राईव्ह हादरलं! पाहा VIDEO

मरिन ड्राईव्हवर गोंधळाचं वातावरण होतं. ही धक्कादायक घटना नरिमन पॉईंटजवळ घडली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

प्रशांत बाग प्रतिनिधी, मुंबई : रविवारची सकाळ मुंबईकर आणि मरिन ड्राईव्हवरील लोकांना हादरवून टाकणारी ठरली. एक सुसाट भरधाव कार एकामागे एक गाड्यांना ठोकत पुढे गेली आणि भयंकर घटना घडली. मरिन ड्राईव्हवर गोंधळाचं वातावरण होतं. ही धक्कादायक घटना नरिमन पॉईंटजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार चालक रॅश ड्रायव्हिंग करत होता. सुसाट कारने एकामागे एक करत 3 वाहनांना ठोकलं. यामध्ये काहींना किरकोळ दुखापत झाली. या घटनेचा व्हिडीओ न्यूज 18 लोकमतच्या हाती आला आहे. यामध्ये वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

जाहिरात

एअर इंडिया इमारत समोर ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. नरिमन पॉईंट जवळ या घटनेनंतर लोकांनी गर्दी केली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. कारचा वेग इतका भयानक होता की वाहनांना ठोकून कार पूर्ण उलट्या दिशेला फेकली गेली. गाडीतील 3 युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या कारमध्ये मद्याच्या बाटल्या आणि गांजा तर काही ड्रग्सही असू शकतात असा प्राथमिक अंदाज आहे. तीन युवकांना पोलिसांनी मरिन लाईन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेलं असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात