जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Big News! मुंबईत Corona चा कहर, 24 तासांत 10,860 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

Big News! मुंबईत Corona चा कहर, 24 तासांत 10,860 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

Big News! मुंबईत Corona चा कहर, 24 तासांत 10,860 नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णासंख्येत झपाट्यानं वाढ होत असून गेल्या 24 तासांत 10, 860 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 जानेवारी: मुंबईत (Mumbai) कोरोनाचा (Corona rising) कहर सुरू झाला असून नव्या 10 हजार 860 रुग्णांची  (10860 new patients) नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत (Patients) झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबईतील रुग्णसंख्या कित्येक पट अधिक वेगानं वाढत असून गेल्या 24 तासांत 2 जणांचा मृत्यू (2 deaths) झाल्याची नोंद करण्यात आली आहे.   अशी आहे ताजी आकडेवारी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत गेल्या 24 तासांत 10,860 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या रुग्णांसह मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे 8 लाख 18 हजार 462 वर. गेल्या 24 तासांत मुंबईत 834 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे 4491 वर. गेल्या 24 तासांत दाखल झालेल्या रुग्णांपैकी 52 रुग्णांची तब्येत गंभीर असून  त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे.  

News18

इमारती होतायत सील आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार सध्या 389 इमारती सील करण्यात आल्या आहेत, तर झोपडपट्ट्या आणि चाळी मिळून एकूण 16 कंटेनमेंट झोन निश्चित करण्यात आले आहेत.   हे वाचा -

लॉकडाऊनच्या दिशेनं प्रवास? मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत जर दैनंदिन रुग्णांचा आकडा 20 हजारांच्या वर गेला, तर केंद्र सरकारच्या नियमानुसार लॉकडाऊन जाहीर करावा लागणार आहे. सध्या दैनंदिन रुग्णसंख्येनं दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट वेगाने पसरणारा असल्याचं यातून पु्हा एकदा सिद्ध झालं आहे. तर मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा 89 टक्के नोंदवला गेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात