मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुसळधार पावसामुळे मुंबईत साचलं पाणी, आजही हवामान खात्याकडून या भागांत रेड अलर्ट

मुसळधार पावसामुळे मुंबईत साचलं पाणी, आजही हवामान खात्याकडून या भागांत रेड अलर्ट

आजही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आज अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.

आजही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आज अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.

आजही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आज अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar

मुंबई, 04 ऑगस्ट : सोमवारी संध्याकाळपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसमुळे मुंबईसह अनेक उपनगरांत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. मुंबईत रात्रभर अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर आजही मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीत आज अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.

आज अनेक भागात हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर व उपनगरात आज मुसळधार पर्जन्यवृष्टीची शक्यता असून समुद्रास दुपारी 12:47 वाजता भरती येणार आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे तसेच पाणी भरलेल्या ठिकाणापासून लांब राहावं.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंदमाता, दादर टीटी, शक्कर पंचायत, एसआयईएस महाविद्यालय, भेंडी बाजार जंक्शन, षण्मुखानंद हॉल, गोयल देऊळ, शेख मिस्त्री दरगाह मार्ग इथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर जूनच्या सुरुवातीला राज्यातील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून एकूण फक्त 39.82 टक्के एवढाच पाणीसाठा आहे. सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागातील धरणांमध्ये 55 टक्के एवढा असून पुणे विभागातील धरणांमध्ये नीचांकी 35.62 टक्के एवढा पाणीसाठा आहे. त्यामुळे राज्यावरील जलसंकट गहिरे झाले आहे.

First published:

Tags: Mumbai rain, Weather Department