मुंबई, 27 जुलै : गेल्या आठवड्याभरापासून मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गुरुवार २७ जुलै रोजी दुपारी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग बंद राहील. तर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून वाहतूक सुरू राहणार आहे. एक्सप्रेस वेवर दरड कोसळल्यानंतर तीन दिवसांपूर्वी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरड हटवण्यासाठी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. आता २७ जुलै रोजी दुपारी १२ ते दोन पर्यंत मुंबई एक्सप्रेस वे बंद असणार आहे. अद्याप एक्सप्रेस वेवर काही ठिकाणी दगड अडकले आहेत. ते धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे असे दगड काढण्यासाठी मार्गिका दोन तास बंद ठेवली जाणार आहे. बोरगाट महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बंद ठेवला जाणार असल्याचं सांगितलं आहे. याआदधी २३ जुलै रोजी आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. यावेळी दगड-मातीचा ढिगारा महामार्गावर आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.