मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनरचा ब्रेक फेल, सहा वाहनांना धडक; एकाचा मृत्यू

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनरचा ब्रेक फेल, सहा वाहनांना धडक; एकाचा मृत्यू

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघातात हात तुटल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊन रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई, 23 मे : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. एका कंटेनरने सहा वाहनांना धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईला जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला. यानतंर कंटनरने सात वाहनांना धडक दिली. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.

ब्रेक फेल झालेल्या कंटनेरने सात वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की ज्या वाहनांना धडक दिली त्यातील प्रवाशांना गंभीर जखम झाली आहे. अपघातानंतर आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पॉलिसी यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, आरटीओ, लोकमान्य ॲम्बुलन्स यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी पोचली. सर्व जखमींना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक उपचार करून जखमींना एमजीएम रुग्णालय पनवेल येथे शिफ्ट केले.

मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिसांना आलेल्या मेसेजनं खळबळ 

अपघातात मृत्यू झालेल्यांचे नाव सुभाष पंढरीनाथ चौगुले असं आहे. ते नवी मुंबईतील वाशी इथं राहत होते. अपघातानंतर रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर चंद्रकला सुभाष चौगुले वय 43, रा. वाशी, अमित कुमार श्रीहरिराम थठेर, वय 30, रा. भांडुप, कौसर अली शाह, वय 40, रा. भांडुप, आफताब समीउल्ला आलम, वय 19, रा भांडुप, अफसर अली मोहम्मद अली, वय 36, रा. वडाळा हे जखमी आहेत. त्यांना पनवेल येथे एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, हात तुटल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊन रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर असून अन्य तीन प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. कंटेनरचा चालक अपघाताच्या ठिकाणाहून पळून जात असताना वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून चालकाला ताब्यात घेतले.

First published:
top videos

    Tags: Mumbai pune expressway