(Bhandup Dreams Mall Fire: मुंबईत भांडूपच्या ड्रीम मॉलला लागलेल्या आगीत 10 बळी गेले. याठिकाणी असणाऱ्या सनराइज हॉस्पिटललाही झळ लागल्याने बळींची संख्या वाढली.
मध्यरात्रीनंतर लागलेली आग सकाळनंतर आटोक्यात आली. आग शमल्यानंतर मॉलची ही अशी लक्तरं झालेली बघायला मिळाली. अंगावर काटा आणणारी ही अवस्था पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होरपळून मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांची माफी देखील मागितली.
रुग्णालय आणि मॉल व्यवस्थापन यांची याबाबतीत चौकशी केली जाईल. यामध्ये कुणाचा दोष असेल तर कायद्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळाला भेट दिल्यानंतर म्हणाले.
आगीच्या घटनेची तत्काळ चौकशी करून दोन दिवसात अहवाल सादर करू, असं आश्वासन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे.