मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Dharavi कोरोनामुक्त करण्यासाठी Mumbai महापालिकेचा आता नवा plan, उचललं अनोखं पाऊल

Dharavi कोरोनामुक्त करण्यासाठी Mumbai महापालिकेचा आता नवा plan, उचललं अनोखं पाऊल

Coronavirus in Mumbai : कोरोनाविरोधातील लढ्यात सहभागी होण्यासाठी पालिका मुंबईकरांना वेगवेगळ्या पद्धतीने आवाहन करत आहे.

Coronavirus in Mumbai : कोरोनाविरोधातील लढ्यात सहभागी होण्यासाठी पालिका मुंबईकरांना वेगवेगळ्या पद्धतीने आवाहन करत आहे.

Coronavirus in Mumbai : कोरोनाविरोधातील लढ्यात सहभागी होण्यासाठी पालिका मुंबईकरांना वेगवेगळ्या पद्धतीने आवाहन करत आहे.

मुंबई, 30 मार्च : कोव्हिड 19 विरोधातील लढ्याला मुंबईकरांनी (Coronavirus in Mumbai) पाठिंबा द्यावा म्हणून पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. हा लढा अनेक रूपाने असू शकतो. लस (Corona Vaccine) टोचून स्वतःला सुरक्षित करून या लढ्यात सामील होता येईल आणि म्हणूनच पालिका मुंबईकरांना वेगवेगळ्या पद्धतीने आवाहन करत आहे. अशाच स्वरुपाचं एक आवाहन म्हणजे पालिकेने पहिल्यांदा तुलू, तेलगू,उर्दू, हिंदी अशा सगळ्या भाषांचा वापर करत पत्रक छापली आहेत. धारावीत लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद अत्यंत संथ असल्याने धारावीकारांच्या थेट जवळ जाण्यासाठी मुंबई मनपाने हा प्रयत्न केला आहे.

24 भाषा बोलल्या जाणाऱ्या धारावीची आतापर्यंत आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी ही ओळख होती. तीच धारावी कोरोनाला हरवणारा भाग म्हणूनही जगाच्या नकाशात ओळखली गेली. या धारावीत वेगवेगळ्या भाषिक रहिवाशांचे छोटे छोटे समूह आहेत. इथे विविध दक्षिण भारतीय भाषा बोलणारे हजारो रहिवासी आहेत. तेलगू, तुलू,तामिळ, उर्दू भाषिकांची संख्या मराठी भाषिकांच्या तुलनेत जास्त आहे. यांना जर लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्यांना त्यांच्या मातृभाषेत आवाहन करणं गरजेचं आहे. म्हणून जी उत्तर प्रभागांच्या वतीने उर्दू, तुलू, तेलगू हिंदी भाषेत पत्रक छापून ती भिंतीवर चिटकवली जात आहेत.

हेही वाचा - लोकांच्या विरोधानंतरही Government lockdown लावणार? Rajesh Tope यांनी दिली महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया

धारावीतील लसीकरण केंद्रावर प्रतिदिवशी 1000 जणांचं लसीकरण करण्याची सोय आहे. मागच्या 3 दिवसात 3000 जणांचं लसीकरण होणं अपेक्षित असताना फक्त 253 जणांचं लसीकरण करण्यात आलं. म्हणजे एकूण क्षमतेच्या 10 टक्के इतकेही लसीकरण होऊ शकलं नाही.

या प्रभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांचं म्हणणं आहे की, ' साधारण दीड महिन्यात आम्ही इथलं लसीकरण आटपू असं आम्हाला वाटलं होतं, पण आतापर्यंत संथ प्रतिसाद आहे. काल सगळ्यात जास्त म्हणजे अवघ्या 100 जणांचं लसीकरण झालं. त्यामुळे नुसती पत्रकं नाही तर आम्ही त्यांच्या त्यांच्या भाषेत कव्वाली गाणी यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना लसीकरणाचं महत्व कळावं म्हणून हा प्रयत्न आहे. कन्नड, तुलू तेलगू, गुजराती अशा अनेक भाषातून आमचा प्रयत्न सुरू आहे.'

काय लिहिलं आहे या पत्रकात?

'धारावीत 60 फूट रोडवरील सिविक सुविधा केंद्र म्हणजेच सायन हॉस्पिटलमध्ये कोविड 19चं लसीकरण केंद्र सुरू केलं जात आहे. 45 वर्षांच्या नागरिकांना ब्लड प्रेशर, मधुमेह किंवा इतर आजार आहेत आणि 60 वर्षावरील नागरिकांना लस दिली जात आहे. सकाळी9 ते 5 या काळात लोकांना लस दिली जाणार आहे. आधी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून मग इथे लस दिली जाईल किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही अशांना इथे रजिस्ट्रेशनची सोय करण्यात आली आहे तरी या सेवेचा लाभ घ्यावा,' असं आवाहन या पत्रकांमधून करण्यात आलं आहे.

दरम्यान, धारावीत रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी धारावी पॅटर्न तयार केला गेला, जो अनेक ठिकाणी अवलंबला गेला. त्याच धारावीत आता रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धारावी कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Covid-19, Dharavi, Mumbai