मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

चांगली बातमी: मुंबई पालिकेच्या 'या' 6 कोविड सेंटरमध्ये तब्बल 89 हजार रुग्णांवर उपचार

चांगली बातमी: मुंबई पालिकेच्या 'या' 6 कोविड सेंटरमध्ये तब्बल 89 हजार रुग्णांवर उपचार

BMC Covid Centre: कोविडच्या सुरुवातीच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे रुग्णांसाठी बेडची क्षमता वाढवणं गरजेचं होतं.

BMC Covid Centre: कोविडच्या सुरुवातीच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे रुग्णांसाठी बेडची क्षमता वाढवणं गरजेचं होतं.

BMC Covid Centre: कोविडच्या सुरुवातीच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे रुग्णांसाठी बेडची क्षमता वाढवणं गरजेचं होतं.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 05 जून: गेल्या वर्षी मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरसनं शिरकाव केला. कोरोनाचा (Corona Virus) प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनानं युद्ध पातळीवर प्रयत्न केले. कोविडच्या सुरुवातीच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात बेड मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे रुग्णांसाठी बेडची क्षमता वाढवणं गरजेचं होतं. त्यानंतर या महामारीचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी पालिकेनं (mumbai Municipal Corporation) कमी वेळेत तात्पुरत्या स्वरुपातील कोविडचे रुग्णालयं म्हणजेच जंम्बो कोविड सेंटर उभारले. या सेंटरमध्ये आतापर्यंत 89 हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी उपचार घेतले.

यात पालिकेनं वरळीत NSCI, बीकेसी, गोरेगाव, भायखळा, मुलुंड आणि दहिसर यासारख्या ठिकाणी जंम्बो (Jumbo Covid care Centre) कोविड सेंटर उभारले. तब्बल 8 हजार 915 बेड्सचे 6 कोविड सेंटर मुंबईत पालिकेकडून उभारले गेले. आता समोर आलेल्या माहितीनुसार, या सहा जंम्बो कोविड सेंटरमध्ये आतापर्यंत तब्बल 89 हजार 206 रुग्णांवर उपचार करण्यात आलेत. तर या रुग्णांसाठी जवळपास 1 हजार 157 डॉक्टर्स, 1 हजार 137 नर्स, 1 हजार 180 वॉर्डबॉय एकूण 4 हजार 658 एवढं मनुष्यबळ काम करत आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या नेतृत्त्वात या कोविड सेंटरमधील रुग्णालयांचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात येत आहे. पालिकेच्या या सेंटरमधील दैनंदिन आकडेवारीचे संगणकीय आणि ऑनलाईन पद्धतीने संकलन आणि विश्लेषण देखील करण्यात येतं.

वरळी NSCI क्लब कोविड सेंटरमध्ये 597 बेड्स असून आतापर्यंत 9 हजार 81 रुग्णांवर उपचार करण्यात आले. या रुग्णालयात कोविड होऊन गेलेल्या रुग्णांसाठी 'रिहॅबिलिटेशन केंद्र' देखील कार्यरत आहे.

बीकेसी कोविड सेंटरमध्ये 2 हजार 328 बेड्स उपलब्ध आहेत. तसंच येथे 2 हजार 328 बेडमध्ये 67 व्हेंटिलेटर, 108 ICUआणि 896 ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. या सेंटरमध्ये आतापर्यंत 24 हजार 149 रुग्णांवर उपचार करण्यात आले.या रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र देखील असून आजवर 2 लाख 43 हजार 500 लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

गोरेगाव कोविड सेंटर

या सेंटरमध्ये 2 हजार 221 बेड्स असून वर्षभरात 21 हजार 637 रुग्णांवर उपचार करण्यात आले. तसंच येथे डायलिसिसची नियमित गरज असणाऱ्या कोविड बाधित रुग्णांसाठी या ठिकाणी 10 'डायलिसिस युनिट' कार्यरत आहेत.

हेही वाचा- 'या' जिल्ह्यात सोमवारपासून अंत्यविधीसाठी कोणतीही बंधनं नाही, वाचा सविस्तर

भायखळा कोविड केअर सेंटर

एक हजार बेड्स असलेल्या या कोविड सेंटरमध्ये वर्षभरात 11 हजार 261 रुग्णांवर उपचार करण्यात आले.

मुलुंड जंम्बो कोविड सेंटर

1 हजार 708 बेड्सच्या या सेंटरमध्ये गेल्या वर्षभरात 12 हजार 927 रुग्णांनी उपचार घेतले. तसंच या सेंटरमध्ये 300 इतक्या संख्येनं 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स' ही उपलब्ध आहेत.

दहिसर कोविड सेंटर

या सेंटरमध्ये 1 हजार 61 बेड्स उपलब्ध आहेत. आतापर्यंत 10 हजार 151 रुग्णांवर या सेंटरमध्ये उपचार करण्यात आले.

First published:

Tags: Coronavirus, Covid centre, Mumbai muncipal corporation