जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai News : अटकेतून वाचवण्यासाठी आरोपीकडे मागितली लाच, पोलीस निरीक्षकासह हवालदारास अटक

Mumbai News : अटकेतून वाचवण्यासाठी आरोपीकडे मागितली लाच, पोलीस निरीक्षकासह हवालदारास अटक

लाच घेणाऱ्या पोलीस निरीक्षकाला अटक

लाच घेणाऱ्या पोलीस निरीक्षकाला अटक

पहिला हप्ता 2 लाख रुपये स्वीकारताना भूषण दायमा यांच्यासह रमेश बतकळस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै : आरोपीकडे लाच मागणाऱ्या पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला मदत करण्यासाठी 25 लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणी अटक केलेल्यांची नावे भूषण दायमा आणि रमेश बतकळस अशी आहेत. मुलुंड पोलीस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोलीस निरीक्षक भूषण दायमा करत होते. आरोपीने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. पण न्यायालयाने अर्ज नाकारला होता. तेव्हा भूषण दायमा याने आरोपीला अटक करण्याची भीती दाखवली आणि गुन्ह्याचे स्वरुप कमी करण्यासाठी लाचेची मागणी केली होती. यानंतर संबंधित आरोपीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. एसटी अपघाताची मालिका सुरूच; मुंबई-गोवा महामार्गावर बसचा भीषण अपघात

 भूषण दायमा हे मुलुंडमधील अगराल हॉस्पिटलच्या आयसीयुत बोगस डॉक्टर प्रकरणाचा तपास करत होते. या प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी त्यांनी 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड करून 11 लाख रुपयांवर ते तयार झाले. यातला पहिला हप्ता 2 लाख रुपये स्वीकारताना भूषण दायमा यांच्यासह रमेश बतकळस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. या दोघांविरुद्धा गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

मुलुंडमधील अगरवाल हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात नोंदणीकृत डॉक्टरच्या नावावर दुसरेच दोघे काम करत होते. या प्रकरणी गोल्डी शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी चंद्रशेखर यादव आणि सुशांत जाधव या दोन बोगस डॉक्टरांना अटक केली होती. या डॉक्टरांची नेमणुक करणाऱ्या सुरेखा चव्हाण यांनाही अटक केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात