Home /News /mumbai /

Mumbai Corona : धारावीकरांनी करून दाखवलं, शून्य रुग्णसंख्येवरून महापौरांनी मानले आभार

Mumbai Corona : धारावीकरांनी करून दाखवलं, शून्य रुग्णसंख्येवरून महापौरांनी मानले आभार

धारावीकरांचे आभार मानायला हवेत. धारावीकरांनी हे करून दाखवलंय. येथील वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या पथकाच्या माध्यमातून चांगलं काम करण्यात आलंय, असे पेडणेकर आज पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

    मुंबई, 14 जून :  कोविड 19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदा शून्य रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. (Dharavi COVID 19 zero new cases) गेल्या 24 तासात तेथे एकही रुग्ण सापडला नाही. याबाबत बोलताना आज मंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी धारावीकरांचं कौतुक केलं. या भागातील वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या पथकाने चांगले काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. धारावीकरांचे आभार मानायला हवेत. धारावीकरांनी हे करून दाखवलंय. येथील वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या पथकाच्या माध्यमातून चांगलं काम करण्यात आलंय, असे पेडणेकर आज पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू असताना धारावी हॉटस्पॉट बनली होती. मात्र, महापालिकेने त्यात धारावी मॉडेल राबवत रुग्णसंख्या सातवेळा शून्यावर आणली आहे. त्यानिमित्ताने मुंबईच्या महापौरांनी धारावीकरांचे आभार मानले आहेत. धारावीत लोक दाटीवाटीने राहतात. तरीही येथील नागरिकांनी नियमांचे पालन केले. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम' धारावीकरांनी यशस्वी केली. पालिकेचे धारावी विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आणि त्यांच्या टीमने योग्य नियोजनबद्ध काम केले. धारवीकरांनी जे करून दाखवले आहे. त्यात सातत्य राखण्याची गरज आहे', असे मत महापौरांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, पहिल्यांदाच धारावीत शून्य रुग्ण संख्येची नोंद झाली आहे. धारावीत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या प्रथमच शून्यावर आली आहे. जी / उत्तर (G/North Ward ) वॉर्डमधील कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई पालिकेनं जाहीर केली. या आकडेवारीनुसार, (Brihanmumbai Municipal Corporation ) या वॉर्डमध्ये केवळ 9 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. हे वाचा - रेल्वेकडून खूशखबर! ‘या’ लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा होणार सुरू, वाचा संपूर्ण यादी त्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत पहिल्यांदा एकही रुग्ण आढळून आला नाही. याआधी एक दिवस हा आकडा दोनवर होता. सध्या धारावीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 861 इतकी आहे. तर दादरमध्ये 3 तर माहिममध्ये 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona updates, Coronavirus, Dharavi, Kishori pedanekar, Mumbai Mayor

    पुढील बातम्या