जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / ‘आंब्याची नक्षीदार नायलॉनची साडी, आमचे हे म्हणतात तू दिसतेस कमी जाडी’, असाही आंबा महोत्सव, VIDEO

‘आंब्याची नक्षीदार नायलॉनची साडी, आमचे हे म्हणतात तू दिसतेस कमी जाडी’, असाही आंबा महोत्सव, VIDEO

‘आंब्याची नक्षीदार नायलॉनची साडी, आमचे हे म्हणतात तू दिसतेस कमी जाडी’, असाही आंबा महोत्सव, VIDEO

आंबा या शब्दाशी निगडीत वेगवेगळ्या उखाण्यांनी मुंबईतील आंबा महोत्वाची लज्जत आणखी वाढवली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 15 मे : उन्हाळा म्हंटलं की सर्वांना आंब्याची आठवण येते. फळांचा राजा असलेल्या आंब्याचे वेगवेगळे पदार्थ घरोघरी केले जातात. आंब्याचं हे महत्त्व लक्षात घेऊन मुंबईमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. तीन दिवस झालेल्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी महिलांसाठी खास उखाण्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आपण आजवर लग्नात किंवा एखाद्या घरगुती समारंभात महिलांना उखाणे घेताना पाहिलं आहे. या आंबा महोत्सवातही महिलांसाठी खास उखाणे स्पर्धा घेण्यात आली. हा उखाणा  घेताना त्यामध्ये ‘आंबा’ या शब्दाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले होते. या नाविन्यपूर्ण स्पर्धेला मुंबईकर महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. पारंपारिक उखाण्यांसह मजेशीर, सामाजिक संदेश देणारे उखाणे त्यांनी सादर केले. यामधील विजेत्या महिलेला ‘मँगो क्विन’ या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

News18लोकमत
News18लोकमत

‘या आंबा महोत्सवात आम्र दिंडी ही वेगळी संकल्पना होती. पाककला स्पर्धाही आयोजित केली होती. त्याचवेळी यंदा पहिल्यांदाच आंबा या शब्दाशी निगडीत उखाणा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा महोत्सवाचं  खास आकर्षण ठरलं. अनेक महिलांनी आंब्याच्या रंगाचे कपडे परिधान करून सहभाग घेतला होता, ’ अशी माहिती या महोत्सवाच्या आयोजक सिद्धी ढोके यांनी दिली. मराठी मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीने सुरू केला आंबे विक्रीचा व्यवसाय, हे आहे कारण ‘या आंबा महोत्सवात मी  पहिल्यांदाच सहभागी झाले होते. आंबा आणि त्याचे गुणधर्म याच्या निगडीत मी उखाणा सादर केला. मी चांगली कामगिरी करेल हा आत्मविश्वास होता. पहिल्याच प्रयत्नात मँगो क्विन झाल्यानं विशेष आनंद आहे, असं या स्पर्धेच्या विजेत्या लक्ष्मी खुशाले यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात