मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अन् भरधाव लोकल पाहून त्याने रुळावर मारली उडी, अंगावर शहारे आणणारी घटना CCTV मध्ये कैद

अन् भरधाव लोकल पाहून त्याने रुळावर मारली उडी, अंगावर शहारे आणणारी घटना CCTV मध्ये कैद

मुंबईत धावत्या लोकल समोर उडी घेत एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. कुर्ला स्थानकातील ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मुंबईत धावत्या लोकल समोर उडी घेत एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. कुर्ला स्थानकातील ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मुंबईत धावत्या लोकल समोर उडी घेत एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. कुर्ला स्थानकातील ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    मुंबई, 18 ऑगस्ट : मुंबईतील पूर्व उपनगरात धावत्या लोकल ट्रेन (Local Train) समोर उडी घेत एका व्यक्तीने आत्महत्या (Man suicide in front of running Local Train) केल्याची घटना समोर आली आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला रेल्वे स्थानकात (Kurla Railway Station) ही घटना घडली असून रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (Caught in CCTV) हा संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुर्ला रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ही घटना घडली आहे. सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास भरधाव लोकल ट्रेन येत असल्याचं पाहून या व्यक्तीने थेट रेल्वे रुळावर उडी मारली. लोकल ट्रेन जवळ आल्यावर या व्यक्तीने थेट रुळावर उडी मारली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या इतर प्रवाशांना काही कळण्या अगोदरच ही घटना घडली. 'राज्यपाल आठवा महिना लागला, निर्णयाचा पाळणा कितव्या महिन्यात हलणार?' 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन शिवसेनेचा निशाणा घटनेत या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीने आत्महत्या का केली? तो व्यक्ती कोण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडून शोधण्यात येत आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृतक इसमाच्या हातावर एक टॅटू असून त्यावर संतोष नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनमधून प्रवासाची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी बंद असल्याने लोकल ट्रेनमधून पडून किंवा आत्महत्येच्या घटनेत मोठी घसरण झाली होती. पण आता लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू होताच अशा घटना पुन्हा सुरू झाल्याचं दिसत आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या