जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Mumbai Local Train : एक मिठीत तर दुसरी मांडीत, गच्च भरलेल्या लोकलमध्ये कपल्सचा टोकाचा रोमान्स, संतापजनक Video

Mumbai Local Train : एक मिठीत तर दुसरी मांडीत, गच्च भरलेल्या लोकलमध्ये कपल्सचा टोकाचा रोमान्स, संतापजनक Video

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कपल्सचा धीर सुटला

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कपल्सचा धीर सुटला

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये दोन कपल्सचा रोमान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे, या व्हिडिओमध्ये दोन कपल्स गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये रोमान्स करताना दिसत आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 मार्च : मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना उभं राहायलाही जागा नसते, अनेकवेळा गर्दीमुळे एकमेकांना धक्के लागल्यामुळे होणारी भांडणं तर रोजचीच असतात, पण मुंबईच्या याच लोकलमधला धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन कपल्स गच्च भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये रोमान्स करताना दिसत आहेत. या दोन्ही कपल्सचा व्हिडिओ सोबत प्रवास करणाऱ्यापैकी एकानेच काढला आहे. या व्हिडिओमध्ये एक कपल एकमेकांच्या मिठीत आहे. तसंच हे कपल एकमेकांना किस करतानाही दिसत आहे. तर दुसरं कपल विंडो सिटवर बसलं आहे. यातल्या विंडो सिटमध्ये बसलेल्या मुलाच्या मांडीवर मुलगी बसलेली दिसत आहे. मुलाच्या मांडीवर बसून ही मुलगी मोबाईल पाहत आहे. मुख्य म्हणजे या कपलच्या बाजूला बसलेला मुलगाही त्यांच्या परिचयाचा वाटत आहे, कारण व्हिडिओमध्ये हा मुलगा दोघांशी बोलताना दिसत आहे. तरीही त्या दोघांची अश्लिल कृत्य सुरू आहेत. या व्हिडिओमधली दोन्ही कपल कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी दिसत आहेत.

जाहिरात

व्हायरल बाबा नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तसंच हा व्हिडिओ सांताक्रुझ ते लोअर परळ या स्टेशनदरम्यानचा असल्याचंही व्हिडिओ ट्वीट करणाऱ्या यूजरने सांगितलं आहे. कोणीतरी आपला व्हिडिओ काढत आहे, याचं भानही या दोन्ही कपलना आलं नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे, तसंच सार्वजनिक ठिकाणी अश्लिल कृत्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात