• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • मुसळधार पावसात दहिसरमध्ये 3 घरे कोसळली, एकाचा मृत्यू

मुसळधार पावसात दहिसरमध्ये 3 घरे कोसळली, एकाचा मृत्यू

मुसळधार पावसात मालाडमध्ये इमारत दुर्घटना झाली असताना आता दहिसरमध्ये तीन घरे कोसळल्याची घटना घडली आहे.

  • Share this:
मुंबई, 10 जून: मुंबईत (Mumbai) मुसळधार पाऊस सुरू होताच दुर्घटनांचे सत्र सुरू झाले आहे. मालाड-मालवणी येथे बुधवारी रात्री इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडल्याच्या घडनेला 24 तास होत नाही तर आता दहिसर येथे तीन घरे कोसळल्याची (3 houses collapsed in Dahisar) घटना घडली आहे. दहिसर येथे झालेल्या या घटनेत एका तरुणाचा मृत्यू (1 youth died) झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दहिसर येथील शिवाजी नगर मधील लोखंडी चाळ येथे तीन घरे कोसळली आहेत. मुसळधार पावसामुळे ही घरे कोसळली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत प्रद्युमन सरोज या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे तर आणखी एक तरुण जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे. मालवणीत इमारतीचा भाग कोसळून 11 मृत्यू  मुंबईतील मालाड मालवणी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास एका चार मजली इमारतीचा भाग शेजारील घरांवर कोसळला. या दुर्घटनेत तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर मृतकांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच जखमींच्या उपचारासाठीचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. तसेच या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आणि जखमी रहिवाशांची रुग्णालयाला जावून विचारपूस केली.
Published by:Sunil Desale
First published: