• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • SSC, HSC Exams: तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचाय का? मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

SSC, HSC Exams: तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचाय का? मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

Bombay high court

Bombay high court

Mumbai HC on SSC, HSC Exams: राज्यातील 10वी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

  • Share this:
मुंबई, 20 मे: राज्यात कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावानंतर इयत्ता 10वीच्या परीक्षा रद्द (SSC exams cancelled) करण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला. तर बारावीच्या परीक्षा (HSC Exams) घेण्यात येणार असल्याचं शिक्षण मंडळाने जाहीर केलं आहे. दहावीच्या परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच खडसावल्याचं पहायला मिळालं. हा काय गोंधळ आहे? सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटलं, तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचाय का? करोनाच्या नावाखाली दहावीची परीक्षा रद्द करून तुम्ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान करू शकत नाही. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असेल तर ती कधी घेणार आहात? दहावीची रद्द करून तुम्ही बारावीची घेणार असल्याचे म्हणताय? हा काय गोंधळ आहे? असा सवालही न्यायालयाने विचारला. Maharashtra SSC Exam: 10वीची परीक्षा रद्द; 12वीच्या परीक्षा होणार, ठाकरे सरकारचा निर्णय न्यायालयाने फटकारले? दहावीची परीक्षा ही शालेय शिक्षणानंतर सर्वात महत्त्वाची असते. ती रद्द करून तुम्ही शिक्षणव्यवस्थेचे नुकसान करताय असं म्हणत न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले. दहावीची परीक्षा रद्द आणि बारावीची घेणार, हा भेदभाव का?  जवळपास 14 लाख विद्यार्थी असलेल्या बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेर घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, मग जवळपास 16 लाख विद्यार्थी असलेल्या दहावीची परीक्षा रद्द का केली? असा भेदभाव का? असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. परीक्षा कधी तरी घ्यायला हवी. परीक्षा घ्यायचीच नाही, ही राज्य सरकारची भूमिका योग्य नाही. न्यायमूर्ती शाहरुख काथावाला व न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाचे गंभीर निरीक्षण. विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल कसा लावायचा, याविषयी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड या मंडळांची काही तयारी तरी आहे. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे गुणांकनाचे सूत्र बनवत असल्याचे ते म्हणत आहेत. महाराष्ट्राच्या एसएससी बोर्डाची काहीच तयारी नाही, परीक्षा रद्द करून गप्प बसले असं म्हणत न्यायालयाच्या खंडपीठाने सरकारला फटकारले.
Published by:Sunil Desale
First published: