आंबिवली पूलाच्या कामासाठी 5 तासांचा मेगाब्लॉक; कल्याण ते कसारा लोकल वाहतूक बंद

आंबिवली पूलाच्या कामासाठी 5 तासांचा मेगाब्लॉक; कल्याण ते कसारा लोकल वाहतूक बंद

कल्याणजवळच्या आंबिवलीचा पूल उभारण्यासाठी आज पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल.

  • Share this:

18 जानेवारी : कल्याणजवळच्या आंबिवलीचा पूल उभारण्यासाठी आज पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. लष्कराकडून या पुलाची उभारणी करण्यात येतं आहे. रुळांच्यामध्ये पुलाचं गर्डर टाकण्यासाठी लष्करानं दिवसा ५ तासांचा ब्लॉक मागितला होता. पूल बांधण्याची डेडलाईन ३१ जानेवारी आहे, त्याआधीच काम पूर्ण होईल असं दिसतंय. पण मेगाब्लॉक दरम्यान अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्यात. शिवाय काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेत.

या ब्लॉकदरम्यान कल्याण ते कसारा दरम्यान लोकल वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. यासाठी एसटीनं कल्याण आणि विठ्ठलवाडी बस डेपोंमधून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. टिटवाळा आणि शहापूरसाठी इथून एसटी सोडण्यात येणार आहे. यासाठी १० ते १२ बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय केडीएमटीच्या बसेसच्याही या काळात विशेष फेऱ्या होणार आहेत.

आंबिवली स्थानकात मेगाब्लॉक

- लोकलच्या एकूण 54 फेऱ्या रद्द

- टिटवाळ्याकडे सीएसएमटीहून सकाळी 9:12 - दु. 1:30 पर्यंत लोकल नाही

- सीएसटीएमच्या दिशेनं सकाळी 9:54 ते दु. 3:02 लोकल नाही

- 4 लांब पल्ल्याZ गाड्या रद्द

- 16 लांब पल्ल्याच्या गाड्यांची वेळ बदलली

या गाड्या केल्या रद्द

-12187 जबलपूर-सीएसएमटी गरीबरथ एक्स्प्रेस

-12188 सीएसएमटी-जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेस

-12118 मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस

-12117 एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस

First published: January 18, 2018, 8:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading