Home /News /mumbai /

सिनेमा नाही सत्य! वडिलांनी स्वप्नात दिली खजिन्याची माहिती, मुलाला सापडली 4 कोटींची चोरी

सिनेमा नाही सत्य! वडिलांनी स्वप्नात दिली खजिन्याची माहिती, मुलाला सापडली 4 कोटींची चोरी

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

लालबागच्या व्यापाऱ्याचं स्वप्न खरं ठरलं आहे. या व्यापाऱ्याच्या स्वप्नात त्याचे दिवंगत वडील आले होते. त्यांनी त्याला कोट्यवधींच्या खजिन्याची माहिती दिली होती.

    मुंबई, 20 जून : स्वप्न (Dream) ही प्रत्येकालाच पडतात. त्या स्वप्नांचे अर्थ लावण्याचे प्रकार आपण सारे जण करतो. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचा प्रत्यक्ष आयुष्याशी संबंध जोडणारे अनेक सिनेमे, गोष्टी आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात स्वप्नातील गोष्टी खऱ्या होण्याचे प्रकार कमीच घडतात. मुंबईतील लालबागच्या व्यापाऱ्याचं स्वप्न मात्र खरं ठरलं आहे. या व्यापाऱ्याच्या स्वप्नात त्याचे दिवंगत वडील आले होते. त्यांनी त्याला कोट्यवधींच्या खजिन्याची माहिती दिली. वडिलांनी स्वप्नात दिलेल्या माहितीनुसार त्या मुलाने खजिन्याचा शोध घेतला आणि तब्बल 4 कोटींच्या चोरीचा उलगडा झाला आहे. काय आहे प्रकरण? 'महाराष्ट्र टाईम्स' नं दिलेल्या वृत्तानुसार लालबागाचे व्यापारी दीपक जैन यांच्या कुटुंबीयांनी गिरगावच्या विठ्ठलवाडी परिसरात एक रूम भाड्यानं घेतली होती. जैन यांच्या वडिलांच्या निधनानंतर ही रूम बंद होती. जैन यांना स्वप्नात त्यांच्या वडिलांनी गिरगावच्या  घरात खजिना असल्याची माहिती दिली. जैन यांनी त्यानंतर थेट गिरगाव गाठले. गिरगावातील घरात अनेक महिने कुणीही फिरकलं नव्हतं. त्यामुळे या घराची साफसफाई केल्याची माहिती घरमालकांनी दिली. त्यावर सफाई कामगारांनी ही चोरी केली असावी असा संशय जैन यांना आला त्यांनी तशी तक्रार लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशनमध्ये केली. जैन यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा तपास सुरू केला. गिरगाावातील घरमालकांनी ज्यांच्याकडून सफाई करून घेतली होती, त्यांची पोलिसांनी चौकशी केली.  सफाई कामगार प्रकाश त्यांचा मुलगा प्रवीण आणि यासिक या तिघांनी घराची स्वच्छता केली होती. पोलिसांनी या सर्वांवर पाळत ठेवली. त्यावेळी त्यांच्या राहणीमाणात बदल झाल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीचा उलगडा झाला. SSC Result 2022 : 43 वर्षांचे वडील 10 वी च्या परीक्षेत पास तर मुलगा झाला नापास त्यांच्याकडून एक किलो सोन्याची बिस्किटे, 800 ग्रॅम सोनं, साधारण 1 कोटी 25 लाखांचे हिरे हस्तगत केले. जैन यांच्या वडिलांनी स्वप्नात सांगितलेली माहिती खरी ठरली. चार कोटींच्या चोरीचा उलगडा स्वप्नामुळे झाल्यानं हे प्रकरण सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनले आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai police, Robbery Case

    पुढील बातम्या