मुंबई, 06 जानेवारी: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचा उद्रेक (Corona outbreak) पाहायला मिळतोय. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा हातपाय पसरु लागला आहे. मुंबईतही (Mumbai) कोरोनाचं प्रचंड थैमान सुरु आहे. मुंबईत काल दिवसभरात तब्बल 15 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित (coronavirus patients) रुग्ण आढळले आहेत. त्यात आताच समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील जवळपास 230 निवासी डॉक्टरही (230 Resident doctors) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
गेल्या 3 दिवसांत मुंबईतील विविध रुग्णालयांतील एकूण 230 निवासी डॉक्टरांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, जेजे रुग्णालयाचे अध्यक्ष गणेश सोळुंकी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांनी पहिल्या-दुसऱ्या लाटेचा रेकॉर्ड मोडला
मुंबईत काल दिवसभरात तब्बल 15 हजारांपेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे चाचणी करणाऱ्या प्रत्येक तीन जणांनंतर चौथी व्यक्ती कोरोनाबाधित आढळत आहे. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट हा थेट 25 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Maharashtra | A total of 230 resident doctors from various hospitals in Mumbai have tested positive for COVID-19 in the last 3 days: Ganesh Solunke, president of JJ Hospital, Maharashtra Association of Resident Doctors
— ANI (@ANI) January 6, 2022
मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 15 हजार 166 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा प्रचंड चिंता वाढवणारा आहे. कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर हा थेट 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना चाचणीत प्रत्येकी तीन रुग्णांनंतर चौथ्या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येतोय. त्यामुळे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. प्रशासन या संकटाला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे. पण ही रुग्णवाढ लवकरात लवकर थांबवणं आणि कमी करणं हे प्रशासनापुढे आताच्या घडीतील सर्वात मोठं आव्हान आहे. याशिवाय कोरोनाचा रिकव्हरी रेट हा दोन टक्क्यांनी खाली घसरला आहे.
हेही वाचा- स्मोक डिटेक्टर बंद, तीन मजली इमारतीला आग, 50 मिनिटांत 7 मुलांसह 13 जणांचा मृत्यू
मुंबईत दिवसभरात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांपैकी 13 हजार 195 रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. त्यांना उपचाराचा योग्य सल्ला देऊन होम क्वारंटाईन आणि इतर सल्ल्यानुसार क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तर दिवसभरात 1218 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. कोरोनावर बुधवारी 714 जणांनी मात केलीय. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मुंबईत 462 इमारती सील
मुंबईत कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता महापालिका देखील कामाला लागली आहे. महापालिकेने आतापर्यंत 462 इमारती सील केल्या आहेत. तसेच 20 कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. एका इमारतीत दहा पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येत आहेत. एखाद्या मजल्यावर कोरोनारुग्ण आढळल्यास तो मजला सील करण्यात येतोय. रुग्ण सापडलेल्या ठिकाणी तेथील नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आलीय. तसेच त्या नागरिकांची देखील महापालिकेकडून टेस्ट केली जात आहे. नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट होईपर्यंत इमारत सील केली जातेय. तसेच रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांनाही सक्तीचे 14 दिवस क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus, Mumbai