काँग्रेसच्या बैठकीत उमेदवारीवरून नेत्यांच्या समर्थकांनी घातला गोंधळ

काँग्रेसच्या बैठकीत उमेदवारीवरून नेत्यांच्या समर्थकांनी घातला गोंधळ

उमेदवारी कुणायला द्यायची या मुद्यावरून नसीम खान प्रिया दत्त यांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ घातल्याने बैठकीला गालबोट लागलं.

  • Share this:

मुंबई 14 जानेवारी :  काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीत मुंबईतील पाच जागांच्या उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. या सर्व जागांवरचे उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आले आहेत. मुंबईतल्या एकूण 6 जागांपैकी पाच जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.

पण उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात यावेळी उमेदवारी कुणायला द्यायची या मुद्यावरून नसीम खान प्रिया दत्त यांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ घातल्याने बैठकीला गालबोट लागलं. दत्त समर्थकांची पुन्हा प्रिया दत्त यांनाच उमेदवारी द्यावी असा आग्रह धरला तर नसीम खान समर्थकांनी नसीम खान यांच्या नावासाठी आग्रह धरला.

मतदार संघात मुस्लिम  मतदार  जास्त असल्याने नसीम खान उमेदवारी द्यावी अशी मागणी काहीनी करताच गोंधळ निर्माण  झाला.  प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांना अखेर कार्यकर्त्यांना शांत करावे लागले.

या बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्विराज चव्हाण, संजय निरुपम यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत प्रत्येत मतदारसंघातल्या निवडक नावांवर चर्चा करण्यात आली. सर्व जागांसाठी फार वाद नसल्याने सर्व उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत. ही सर्व नावं अंतिम मान्यतेसाठी दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हे आहेत संभाव्य उमेदवार

दक्षिण मुंबई  - मिलिंद देवरा

दक्षिण मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड

उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त यांच्या जागेवर अभिनेत्री नगमा यांनी  दावेदार सांगितली.

उत्तर मुंबई - कृपाशंकर सिंह हे मुख्य दावेदार आहेत.

उत्तर पश्चिम मुंबई  - संजय निरुपम यांनी इच्छा व्यक्ती केली.

आघाडी च जागावाटप दोन दिवसात निश्चित होईल त्या दृष्टीने ही बैठक महत्वाची मानली जाते. काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून उमेदवार निवडीसाठी अडचण येणार नाही अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलीय.

First published: January 14, 2019, 8:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading