मुंबई, 26 ऑक्टोबर : वांद्रे स्टेशनजवळच्या गरीबनगर झोपडपट्टीत लागलेली आग विझलीये. दुपारी अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू असताना अचानक आग लागली. त्यानंतर जवळपास चार सिलेंडरचे स्फोट झाले. आग भडकल्यानं अग्निशमनदलाच्या 22 गाड्या घटनास्थळी बोलावण्यात आल्या होत्या. आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. . या आगीची छळ थेट रेल्वेच्या तिकिट खिडकीपर्यंत पोहोचल्याने हार्बर लाईनची सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली होती. तसंच या परिसरातली वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. ज्यावेळी अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असते त्यावेळी या झोपडपट्टीत आग लागल्याची घटना यापूर्वीही घडली होती. त्यामुळे आगीमागं संशयाचा धूर असल्याची शक्यता आहे. अतिक्रमण विभागाच्या कारवाईदरम्यान, एका सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग भडकलीय. प्रशासनाने कारवाई करण्याआधी माहिती पूर्वसूचना देणं अपेक्षित होतं. असं स्थानिक नगरसेवकाने म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.