मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Airport: "आम्हाला डिवचण्यासाठी गरबा कराल तर आम्हालाही झिंगाट दाखवावा लागेल" मनसेचा इशारा

Mumbai Airport: "आम्हाला डिवचण्यासाठी गरबा कराल तर आम्हालाही झिंगाट दाखवावा लागेल" मनसेचा इशारा

मुंबई विमानतळाच्या मुद्द्यावरुन आता राजकारण तापताना दिसत आहे. मनसेने आपल्या खास स्टाईलमध्ये अदानी समूहाला इशारा दिला आहे.

मुंबई, 20 जुलै: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Chhatrapati Shivaji Maharaj international Airport Mumbai) व्यवस्थापनाचा ताबा अदानी समूहाकडे (Adani Group) देण्यात आला आहे. हा ताबा मिळताच अदानी उद्योग समूहाने आपले मुंबईतील मुख्यालय हे गुजरातला हलवलं आहे. त्यातच सोशल मीडियात सुद्धा एक व्हिडीओ व्हायरल होत होता. या संपूर्ण प्रकरणात आता मनसेने उडी घेत अदानी समूहाला इशारा (MNS warns adani group) दिला आहे.

मुंबई विमानतळाचे व्यवस्थापन जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाकडे देण्यात आले आहे. व्यवस्थापनाचा एकूण 74 टक्के हिस्सा आदा अदानी समूहाकडे आला आहे. हा निर्णय झाल्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अदानी समूहाचे काही कर्मचारी गरबा करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेने या प्रकरणात उडी घेतली आहे.

मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट करत इशाराच दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, "फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलंय... विमानतळ मुंबईमध्येच आहे.... आम्हाला डीवचण्यासाठी गरबा कराल तर आम्हालाही आमचा झिंगाट दाखवावा लागेल."

मुंबई विमानतळावरून जीव्हीकेचे रेड्डी गेले आणि अदानी आले. व्यवस्थापन कोणाचेही असो पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आवाज हा मराठी माणसाचाच असेल हे लक्षात असू द्या असंही ट्विट नितीन सरदेसाई यांनी केलं आहे.

First published:

Tags: Maharashtra, MNS, Mumbai