जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / काँग्रेस विरुद्ध काँग्रेस! दहाव्या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आमने-सामने

काँग्रेस विरुद्ध काँग्रेस! दहाव्या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आमने-सामने

काँग्रेस विरुद्ध काँग्रेस! दहाव्या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आमने-सामने

राज्यसभेप्रमाणे विधान परिषदमध्येही भाजपने आघाडीला धोबीपछाड दिला आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे सर्व उमेदवार वियजी झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जून : आजची विधान परिषद निवडणूक (MLC Election result) एखादा क्रिकेटचा सामना चालावा अशी उत्कंठावर्धक झाली. अजूनही काही निकाल हाती येणे बाकी आहे. मात्र, आतापर्यंत मिळालेल्या निकालानुसार देवेंद्र फडणवीस यांचा प्लान यशस्वी ठरला आहे. भाजपचे पाचही उमेदवार जवळपास विजयी झाले आहेत. श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रविण दरेकर, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे देखील विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र, आता सामना काँग्रेसच्या दोन उमेदवारांमध्ये रंगत असताना दिसत आहे. दहाव्या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आमने-सामने या निवडणुकीत सर्व प्रकारची तयारी करुनही महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड विजयच्या उंबरयावर आहे. त्यांना अवघ्या 5 मतांची गरज आहे. म्हणजे आता दहाव्या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आमने सामने आले आहेत. त्यामुळे आता कोणीही वियजी किंवा पराभूत झालं तरी काँग्रेलाच फटका बसणार आहे. MLC Election result : फडणवीसांचा चमत्कार कायम, भाजपचे पाचही उमेदवार विजयी आघीडीची 21 मतं फुटली राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही कुठलीही चूक होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील पक्षांनी विशेष काळजी घेतली होती. आमदारांना फाईव्हस्टार हॉटेलमध्ये राहण्याच्या सोयीपासून मतदान कसं करायचं? इथपर्यंत तालीम देण्यात आली होती. असे असतानाही आघाडीची एकदोन नाही तर तब्बल 21 मतं फुटली आहे. 10 जागांसाठी 11 जण रिंगणात विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात असल्यामुळे त्यातच गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची कमाली उत्सुकता शिगेला पोहोचली होती. राज्यसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवत भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले होते. त्यामुळे विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली होती. त्यांनी सर्व आमदार आपल्याच देखरेखीखाली ठेवली होती. मतदानाच्या दिवशीही मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांशी चर्चा करूनच मतदानाला पाठवले होते. यावेळी शिवसेनेनं कोणताही दगाफटका नको म्हणून आपल्याच आमदारांच्या संख्याबळावर आपले उमेदवार विजयी करण्यावर भर दिला होता. महाविकास आघाडीच्या एकूण मतांमध्ये काँग्रेसची 3 मतं फुटल्याचेही समोर आले आहे. काँग्रेसला आपल्या 44 मतापैंकी फक्त 41 मतं मिळाली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात