मुंबई, 08 सप्टेंबर: मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरस (Corona Virus) बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचं चित्र आहे. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका वर्तवण्यात आला आहे. मंगळवारी शहरात 353 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या मुंबईत 3 हजार 718 रुग्णावर उपचार सुरु आहेत. मात्र मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी शहरातल्या कोरोनास्थितीवर भाष्य केलं आहे.
महापौरांनी मुंबईत तिसरी लाट आल्याचं म्हटलं आहे. त्यातच दोन दिवसांवर येणारा गणेशोत्सव साजरा करताना गर्दी करु नका असं आवाहनही किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. राज्य सरकारनं गणेशोत्सव साधेपणानं करण्याचं आवाहन करत एसओपी जाहीर केली आहे. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांनी तिसऱ्या लाटेबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
तालिबानचं ठरलं! अखेर नव्या सरकारची अधिकृत घोषणा, मोहम्मद हसन अखुंद असणार काउन्सिल हेड
कोरोनाची तिसरी लाट येणार नसून ती आली आहे. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघून त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
तसंच शुक्रवारपासून गणेशोत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे यंदाच्याही गणेशोत्सवावत कोरोनाच्या नियमांचं पालन करा. या दिवसात घरीच थांबण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.