मुंबई, 01 ऑक्टोबर : मराठा समाजातील बांधव अद्यापही आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रवीष्ट असल्यामुळे शैक्षणिक वर्षांसाठी अद्यापही मराठा आरक्षण लागू करण्यात आलं नाही. मराठा आरक्षण अद्याप लागू न केल्यामुळे अनेक पडसाद उमटत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा परिस्थित पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडली आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन छत्रपती राजे खासदारांनी केंद्र सरकारकडून आरक्षण मिळवून द्यावं असं वक्तव्य करताना आरक्षणासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं मात्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं आता पाहायला मिळालं आहे. पार्थ पवार यांनी यासंदर्भात ट्वीट करून आपली भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले पार्थ पवार?
'विवेक सारखी तरुण मुलं आत्महत्या करत आहेत, आता तरी मराठा समाजातील नेत्यांनी जागं होऊन तत्काळ मराठा आरक्षणाबाबत लक्ष द्यायला हवं. मराठा समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय किंवा अन्य विचार करावा लागेल. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला हवा अन्यथा विवेक सारख्या अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागू शकतो आणि हेच टाळण्यासाठी राज्य सरकारनं या प्रकरणात तातडीनं लक्ष घालावं अशी मी विनंती करतो.
Devastated to hear of the tragic death of Vivek who committed suicide for the cause of Maratha reservations. Before a chain reaction of such unfortunate incident starts, Maratha leaders have to wake up & fight for this cause. Requesting Maha govt to step in to solve the crisis. pic.twitter.com/r8c3YQUoO0
— Parth Pawar (@parthajitpawar) September 30, 2020
हे वाचा-Unlock 0.5 : एका क्लिकवर पाहा राज्यात काय काय सुरू होणार
जय हिंद जय महाराष्ट्र असे टीव्ट करत पार्थ पवार यांनी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे.मराठा समाजातील युवकाने आरक्षणासाठी आत्महत्या केली, त्यानतंर या मुद्दावर पार्थ अजित पवार यांनी टीव्ट करून मराठा समाजातील नेत्यावर नाराजी सूर लावत सूचक इशारा दिला आहे.
पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील नेत्यांवर बोट दाखवत पुन्हा एकदा शरद पवारांविरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. याआधी राम मंदिर, जय श्रीराम नारा देताना पार्थ पवारांनी घेतल्या भूमिकानंतर शरद पवार यांनी टीका केली होती. मात्र पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे कौटुंबिक वाद वाढला आता पुन्हा एकदा पार्थ यांच्या भूमिकेमुळे आजोबा नातवानं एकमेकांविरोधातील भूमिका घेतली.
हे वाचा-पुणे जिल्ह्यात रस्त्याची विनापरवानगी तोडफोड, गॅस एजन्सीला 45 लाखांचा दंड
मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.विवेक यानं नुकतीच नीट परीक्षा दिली आहे. मात्र, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाल्यानं विवेकनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल असावं, असं त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितल. आरक्षण असतं तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shard pawar