मुंबई, 2 जानेवारी : मुंबईत पोलिसांना (Mumbai Police) गस्त घालण्यास मदत व्हावी म्हणून सेगवे (self balancing electric scooters) प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पेट्रोलिंगसाठी सेगवेचा चांगला उपयोग होणार असल्याचा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home minister Anil Deshmukh) यांनी व्यक्त केला. ते यावेळी म्हणाले की, पोलिसांना अत्याधुनिक गँझेट दिले जात आहे. मुंबई पोलिसांमध्ये आता अश्वदलाचाही समावेश केला आहे. ड्रोन पोलिसिंगसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नवीन वर्षाच स्वागत करताना नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचं चांगलं पालन केलं. त्यामुळे नवीन वर्षात कुठेही गालबोट लागलं नाही.
यावेळी गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांना टोला लगावला. यावेळी ते म्हणाले की, आमच्या पोलिसांना बदनाम करण्यासाठी अनेकजण पुढे आले होते. काहींनी असा विडाच उचलला होता. पण आमच्या पोलिसांनी त्यावर चोख प्रत्युत्तर दिलं. आमचे पोलीस कोरोना संसर्ग काळात सतत काम करून थकले असले तरी त्यांची हिम्मत हरलेली नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
मुंबईत नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरळी सी फेसवर पेलिसांना सेगवे म्हणजेच विद्यूत स्कुटर्स देण्यात येत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सेगवेचं उद्धघाटन होणार आहे. यावेळी सिनेअभिनेेते अक्षय कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. मुंबईत वरळी पोलिसांनाही मरीन ड्राईव्ह येथील सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पेलिसांप्रमाणे सेगवे मिळाल्यामुळे नागरिकांची सुरक्षा अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि पोलिस सह आयुक्त विश्वास नागरे-पाटील हे देखील उपस्थित आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Mumbai police